Home /News /viral /

चक्क माकडाच्या पिल्लानं चिमुकल्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO

चक्क माकडाच्या पिल्लानं चिमुकल्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO

IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवर ट्वीट केला आहे.

    मुंबई, 04 मे : सोशल मीडियावर अनेक हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतापर्यंत माणसानं माणसांना, माणसांनी प्राण्यांना किडनॅप केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील पण एका प्राण्यानं लहान मुलाचं अपहरण केलं आहे असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तर अनेकांची झोप उडाली आहे. माकडाच्या पिल्लानं लहान मुलाला फरफटत नेल्याचा हा व्हिडीओ आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक प्राणी रस्त्यावर आणि माणसांच्या वस्तीमध्ये घसत असल्याचं दृश्यंही अनेक ठिकाणी पाहायला मिळाली. असंच एका माकडाचं पिल्लू माणसाच्या वस्तीत घुसलं आणि त्यानं धुमाकूळ घातला. बाहेर बसलेल्या लहान मुलाला त्यानं दोन्ही पंजानं ओढून फरफटत नेलं आहे. आजूबाजूला स्थानिकांनी या माकडाला हुसकावून लावण्याचा प्रयत्नही केला मात्र माकडानं ऐकलं नाही. हे वाचा-VIDEO: गाणं गाणाऱ्या शाहरुखला अबरामनं असं केलं गप्प! तरीही म्हणतोय 'सब सही होगा' ह्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता. लहान खेळण्याची याकलवर बसून हे माकड लहान मुला जवळ पोहोचलं आणि त्याने उडी मारून हल्ला केला. काही अंतरापर्यंत त्यानं मुलाला फरफटत नेलं त्यानंतर स्थानिक लोक त्याच्या अंगावर धावून आल्यानंतर माकडाचं पिल्लू पळून गेलं. IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवर ट्वीट केला आहे. 6.5 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 235 जणांना रिट्विट केला आहे. हे वाचा-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारच्या 'या' स्कीममुळे लोकांचे वाचले 300 कोटी
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या