बंगळुरू, 4 मे : Coronavirus च्या साथीत माणुसकीची आणि माणुसकीला काळिमा फासणारी दोन्ही उदाहरणं समोर येत आहेत. अशा वेळी एका सोसायटीतला कोरोना योद्धा महिलेचा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 20 दिवस सलग कोरोना रुग्णांची सेवा केल्यानंतर ही डॉक्टर घरी पोहोचली तेव्हा तिचं अनोखं स्वागत झालं. या स्वागताने तिला अक्षरशः गहिवरून आलं. बंगळुरूच्या डॉ. विजयश्री यांच्यासाठी हे असं स्वागत अनपेक्षित होतं. त्या राहात असलेल्या सोसायटीच्या रहिवाशीने उस्फूर्तपणे त्यांनी केलेल्या रुग्णसेवेचं कौतुक म्हणून एकत्रितपणे आपापल्या घरातूनच टाळ्या वाजवल्या. सोसायटीच्या आवारात लॉकडाऊनच्या भयाण शांततेत या टाळ्यांचा आवाज अचानक घुमला आणि या गजरातच डॉ. विजयश्री यांनी घरात 20 दिवसांनंतर आगमन केलं. आपल्या कामाचं असं कौतुक होताना पाहून विजयश्री यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. हा भावुक करणारा VIDEO बंगळुरूच्या महापौरांनी शेअर केला आहे.
ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣುವ ದೇವರು!
— Rakesh Singh IAS (@BBMPAdmn) May 2, 2020
Dr. Vijayashree of Bengaluru received a heroic welcome when she returned home after tending to #COVID19 patients in MS Ramaiah Memorial Hospital.
A big thank you to all the #CoronaWarriors working selflessly on the frontline of this pandemic. We SALUTE you! pic.twitter.com/COHT4KYYE1
एम. गौतम या बंगळुरूच्या महापौरांनी Twitter वर हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे, “एम. एस. रामैय्या रुग्णालयात COVID-19 च्या रुग्णांची 20 दिवस देखभाल केल्यानंत घरी येणाऱ्या डॉ. विजयश्री यांचं असं हीरोच्या थाटात स्वागत झालं.” Lockdown मध्ये बाईकवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन, VIDEO VIRAL त्यांना अशा सगळ्या कोरोना वॉरिअर्सचं कौतुक केलं आहे आणि त्यांचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. माणुसकीचा आणि कृतज्ञतेचा गहिवर याहूनही या अश्रूंमधली भावना मोठी आहे, हेच यातून दिसतं. कहर VIDEO: दारूसाठीच्या रांगेचं हे चित्र पाहून विश्वास नाही बसणार