Home /News /viral /

तक्रार नाकारल्यामुळे पीडितेनं असं केलं की शहर हादरलं, पोलिसांनी थेट आरोपीलाच केली अटक

तक्रार नाकारल्यामुळे पीडितेनं असं केलं की शहर हादरलं, पोलिसांनी थेट आरोपीलाच केली अटक

तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणून तरुणीने असं काही केलं की अख्खं गाव हादरलं

    बुलंदशहर, 12 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामध्ये छेडछाडीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वी, गावातील दोन तरुणांनी दारूच्या नशेत एका युवतीचा विनयभंग केला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर तरुणीने पोलीस स्टेशन गाठलं. तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणून तरुणीने असं काही केलं की अख्खं गाव हादरलं. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मदत केली नाही म्हणून पीडित महिलेने थेट सोशल मीडियावर छेडछाडीचा व्हिडिओ शेअर केला. रविवारी, उशिरा या व्हिडिओ लोकांच्या चर्चेचा विषय झाल्यानंतक पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी पीडित तरुणी शेतातून परत जात असताना हा प्रकार घडल्याचं पीडितेनं पोलिसांना सांगितलं. तिने असा आरोप केला आहे की, त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या गावातील दोन तरुणांनी तिला वाटेतच थांबवलं आणि तिचा विनयभंग करण्यास सुरवात केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून आरोपींनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. 15 दिवसांची चिमुकली झाली पोरकी, तरुण वयातच पोलीस कॉन्स्टेबलने केली आत्महत्या यावेळी आरडाओरड झाल्यामुळे शेजारी स्थानिक लोक तात्काळ धावत आले. गावकऱ्यांना पाहून आरोपींनी पळ काढला आणि जाताना पीडितेला जीवे मारण्याची धकमी दिली. यानंतर पीडितेने धावत पोलीस स्टेशन गाठलं पण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर पीडितेने हाती लागलेला छेडछाडीचा व्हिडिओ थेट सोशल मीडियावर पोस्ट केला. ठाण्यात आज मध्यरात्रीपासून होणार मोठा बदल, हे विभाग होणार पूर्णत: बंद पीडितेने पोलिसांवर कारवाई न केल्याचा आरोप करत रविवारी संध्याकाळी उशिरा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. एसएसपी संतोषकुमार सिंग यांच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मिथिलेश उपाध्याय यांनी सांगितलं की, दोन्ही आरोपी जितेंद्र आणि नितीन यांना अटक करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि मोदींच्या बैठकीनंतर संजय राऊत आक्रमक, केंद्र सरकारवर खोचक संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या