Home /News /news /

ठाण्यात आज मध्यरात्रीपासून होणार मोठा बदल, हे विभाग होणार पूर्णत: बंद

ठाण्यात आज मध्यरात्रीपासून होणार मोठा बदल, हे विभाग होणार पूर्णत: बंद

ठाण्यात रेड झोन असलेल्या शहरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून सर्व दुकानं अनिश्चीत कालावधीसाठी बंद करण्यात येणार आहे.

    ठाणे, 11 मे : कोरोनामुळे राज्यात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत असल्यामुळे आता अनेत शहरांमध्ये लॉकडाऊन कठोर करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. ठाण्यातही कोरोनाची अनेक नवी प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे ठाण्यात रेड झोन असलेल्या शहरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून सर्व दुकानं अनिश्चीत कालावधीसाठी बंद करण्यात येणार आहे. सावरकरनगर प्रभागसमिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 6, 13, 14 व 15 म्हणजेच लोकमान्यनगर, सावरकनगर, इंदिरानगर, ज्ञानेश्वरनगर, काजूवाडी विभागामध्ये कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू असूनदेखील नागरिक दुकानं तसेच भाजी मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणावर गर्दी करीत आहेत. रस्त्यावरील वर्दळदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांमार्फत सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यामुळे लॉकडाऊन करुनसुध्दा काही सुधारण दिसून आलेली नाही. त्यामुळे 11 तारखेच्या मध्यरात्रीपासून हे सर्व विभाग अनिश्चीत कालावधीसाठी पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 दिवसांची चिमुकली झाली पोरकी, तरुण वयातच पोलीस कॉन्स्टेबलने केली आत्महत्या दरम्यान, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने सगळ्या देशाचं लक्ष महाराष्ट्र आणि मुंबईकडे लागलं आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरची चिंता वाढली आहे. मात्र राज्यात आता इतर शहरांमध्येही कोरोनाचा उद्रेक झाल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. औरंगाबाद, सोलापूर आणि मालेगाव सारख्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सरकार समोर आव्हान निर्माण झालं आहे. राज्यात आज 1230 नवे रुग्ण आढळून आले. तर 36 जणांता मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 23401 एवढी झाली आहे. Monsoon 2020 आला रे! या तारखेला देशात होणार आगमन, हवामान खात्याचा अंदाज मुंबईत आज तब्बल 791 रुग्णांची वाढ झाली. तर 587 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. आजच्या 36 पैकी 20 मृत्यू मुंबईतले आहेत. मुंबईतल्या रुग्णांची संख्या 14 हजार 355वर गेली आहे. तर मृत्यूचा आकडा 528 पुणे विभागातील 1 हजार 237 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 365 झाली आहे. तर अॅक्टीव रुग्ण 1 हजार 953 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 115 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. उद्धव ठाकरे आणि मोदींच्या बैठकीनंतर संजय राऊत आक्रमक, केंद्र सरकारवर खोचक टीका संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या