Home /News /news /

उद्धव ठाकरे आणि मोदींच्या बैठकीनंतर संजय राऊत आक्रमक, केंद्र सरकारवर खोचक टीका

उद्धव ठाकरे आणि मोदींच्या बैठकीनंतर संजय राऊत आक्रमक, केंद्र सरकारवर खोचक टीका

लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. ही बैठक पार पडताच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

    मुंबई, 11 मे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा पार पडली. यामध्ये लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. ही बैठक पार पडताच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा अवलंबण्यात आला असताना परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे. विदेशात अडकलेल्या 813 भारतीयांना वंदे भारत मिशन अंतर्गत रविवारी मायदेशात आणलं गेलं. पण भारतात अडकलेल्यांना त्यांच्या इच्छूक जागांवर पोहोचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून यावर टीका केली आहे. 'हमारा कसूर बस इतना ही है कि हम अपने देश में ही मजदूरी करते रहे' अशा शब्दात संयज राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. खरंतर अनेक राज्यांमध्ये मजूर, विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी कोणतीही सोय होत नसल्याने यावर आता टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विदेशातून भारतीयांना आणलं जाऊ शकतं पण भारतात काम करणाऱ्या नागरिकांची व्यवस्था करू नकत नसल्याने नागरिकांमध्येही नाराजीचा सूर आहे. 17 मेनंतर होणार मोठे बदल, मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत केली चर्चा दरम्यान, लंडनमध्ये गेल्या दीड महिन्यापासून काही विद्यार्थी आणि यात्रेकरु अडकले होते. त्या सगळ्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर सगळ्यांना मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे. विदेशात अडकलेले 813 भारतीयांना वंदे भारत मिशन अंतर्गत रविवारी मायदेशात आणले गेले. लंडनहून मुंबईत पहिले विमान दाखल झालं आहे. त्यानंतर सिंगापूर आणि मनीला येथून दोन विमाने मुंबईत पोहोचलं. सिंगापूरहून 243 प्रवाशांना घेऊन निघालेलं एक विमान दुपारी 12 वाजून 30 मिनिटांला मुंबईत पोहोचलं. तर तिसरं विमान मनीलाहून 241 प्रवाशांना घेऊन रविवारी रात्री 11 वाजता मुंबई एअरपोर्टवर पोहोचलं. धक्कादायक! एका क्षणात झाला दोन भावांचा मृत्यू, जनावरांना पाणी आणायला गेले पण... दरम्यान, कोरोनाच्या संकटात भारतातील सुमारे 2 लाख लोकं परदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचे काम सरकारने सुरु केलं आहे. 7 ते 13 मे या कालावधीत एअर इंडियाच्या विमानांच्या 64 फेऱ्या होणार आहेत. त्यात 14 हजार 800 भारतीयांना परत आणले जाणार आहे. एअर इंडियाची 64 विमान आणि त्याची सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस 12 देशांमधील अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले जाणार आहे. या देशांमध्ये युएई, यूके, अमेरिका, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, बांगलादेश, बहरीन, कुवैत आणि ओमानचा समावेश आहे. कोरोना महामारीत शेतकऱ्यांसमोर नवीन रोगाचं संकट, बळीराजा हवालदील संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या