Home /News /maharashtra /

15 दिवसांची चिमुकली झाली पोरकी, तरुण वयातच पोलीस कॉन्स्टेबलने केली आत्महत्या

15 दिवसांची चिमुकली झाली पोरकी, तरुण वयातच पोलीस कॉन्स्टेबलने केली आत्महत्या

स्वभावानं अतिशय मनमिळाऊ म्हणून ओळख असलेल्या तुषार सानप पाहून घटनास्थळी पोलिसांनी अक्षरशः अश्रूंना वाट मोकळी करून देत शोक व्यक्त केली आहे.

बारामती, 11 मे : राज्यात कोरोनाचं संकट असताना पोलीस विभागवार मोठा ताण आला आहे. अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. या बातमीमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडालेली आहे. दुपारी आपली ड्युटी आटोपून पोलीस कॉन्स्टेबल शहरातील पोलीस क्वाटर्स इथे गेले आणि तिथेच गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तुषार सानप असं आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनला कार्यरत ते कार्यरत होते. तुषार सानप यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज दुपारी आपली ड्युटी आटोपून तुषार हे शहरातील पोलीस क्वाटर्स इथे गेले होते. सायंकाळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे तुषार सानप यांना पंधरा दिवसांपूर्वी मुलगी झाली होती. यावेळी घरी छोट्या लाडकीचे आगमन झालं असल्याची बातमी त्यांनी त्यांच्या सहकार्यांना दिली होती. अवघ्या पंधरा दिवसात वयाच्या 30व्या वर्षी तुषार यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुषार सानप यांची पत्नी माहेरी असल्यानं पोलीस वसाहतीतील घरी ते एकटेच राहत होते. सायंकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं. त्यांच्या आत्महत्येनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वभावानं अतिशय मनमिळाऊ म्हणून तुषार सानप यांची ओळख आहे. घटनास्थळी पोलिसांनी अक्षरशः अश्रूंना वाट मोकळी करून देत शोक व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून तुषार यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घरात आनंदाचं वातावरण असताना तुषार यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं याचा पोलीस तपास करत आहेत.
Published by:Manoj Khandekar
First published:

पुढील बातम्या