मुंबई 26 ऑक्टोबर : आजकाल टॅटू काढण्याचा एक ट्रेंडच झाला आहे. ज्यामध्ये तरुणाईं सर्वात पुढे आहे. तरुण मंडळी आपण किती कुल आहोत, हे दाखवण्यासाठी टॅटू काढत असते. ज्यामध्ये मुलांचा समावेश मोठ्याप्रमाणात आहे. तसे पाहाता हा प्रकार फार पूर्वीपासून सुरु आहे. ज्यामध्ये काही वृद्ध लोकांच्या हातावर किंवा कपाळवर काही ना काही लिहिलेलं तुम्हाला दिसले. जुण्या काळातील लोक देवाचं किंवा आपल्या आई-वडलांचं नाव हातावर टॅटू करुन घ्यायचे, ज्याला आपण गोंदवून घेणं देखील म्हणतो. आपल्याकडे भारतात तर लहानांपासून अगदी कोणीही आणि कोणताही टॅटू काढून घेऊ शकतो. परंतू अमेरिकेत मात्र टॅटू काढण्याचे काही वेगळेच नियम आहेत. हे ही पाहा : आगीशी खेळ अंगाशी आला, तरुणाचा स्टंट जीवावर बेतला…. Video Viral अमेरिकेतून टॅटू संबंधी एक असंच प्रकरण समोर आलं आहे, जे वाचून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. या घटनेमध्ये एका आईला आपल्या मुलाच्या हातावर टॅटू काढणं महागात पडलं आहे. एवढंच नाही तर या टॅटूमुळे टॅटू काढणाऱ्या व्यक्तीला देखील जेलची हवा खावी लागली आहे. ही घटना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातून समोर आली आहे. या आईचे नाव क्रिस्टल थॉमस आहे. ही महिला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील हायलँड मोटेलमध्ये तिचा मुलगा आणि भावासोबत राहते रिपोर्टनुसार, महिलेला समजले की तिच्या शेजारच्या घरात कोणीतरी टॅटू बनवते. यानंतर महिला आपल्या मुलासह तेथे गेली. यादरम्यान मुलाच्या हातावर टॅटू बनवून घेतला. असे म्हटले जाते की, आईने मुलाच्या हातावर तिचे नाव लिहिले आहे. हे ही पाहा : Reel करणाऱ्या मुलांनी बस ड्रायव्हरला बनवलं मूर्ख, Video सोशल मीडियावर व्हायरल खरंतर इथपर्यंत सगळं ठिक होतं, पण दुसऱ्या दिवशी मुलगा शाळेत गेला तेव्हा मुलांची काळजी घेणाऱ्या नर्सला मुलाच्या हातावर टॅटू दिसला. वास्तविक, मुलाने शाळेतील नर्सला हातावर व्हॅसलिन चोळण्यास सांगितले. जेव्हा नर्सने त्याचा हात पाहिला तेव्हा तिला कळले की त्याच्या हातावर एक मोठा टॅटू आहे. नर्सने जेव्हा मुलाला टॅटूबद्दल विचारले. तेवहा मुलाने टॅटू कसा बनवला हे सांगितलं, मुलाने सांगितल्या प्रमाणे त्याने जेव्हा हा टॅटू काढला, तेव्हा त्याची आई देखील त्याच्यासोबत नव्हती. अमेरिकेच्या कायद्यानुसार केवळ १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच त्यांच्या शरीरावर टॅटू काढता येतो. हा मुलगा लहान असल्यामुळे त्यांने या नियमाचे उल्लंघन केलं असल्यामुळे मग या मुलाच्या आईला आणि टॅटू आर्टिस्टला अटक करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.