मुंबई 26 ऑक्टोबर : आपला मूड कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ पाहाण्याचा असोत, सोशल मीडिया आपल्या वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच घेऊन येत असतो. येथे आपल्याला इन्फोमेटीव, मजेदार, आर्ट, जेवण, प्रवास यासंदर्भात अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. जे नेहमीच आपलं मनोरंजन करत असतात, ज्यामुळेच एकदा का आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आलो की आपला तासन तास वेळ कसा निघून जातो, हे आपलं आपल्यालाच कळत नाही. त्यात आता लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच रिल्सचे वेड लागलं आहे. लोकांना ते पाहायला तर आवडतातच, पण आता अनेकांचा कल हे व्हिडीओ करण्यावर देखील कल आहे. सध्या या संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो चर्चेत आला आहे. या व्हिडीओत ही खोडकर मुलं असा बस ड्रायवरची अशी काही फसवणूक करातात की व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतकेच नाही तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू देखील येईल. हे ही पाहा : Viral Video : आधी गाईला लाथ मारली मग शेपूट खेचली… त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं या व्हिडीओमध्ये एक मुलगा हायवेवर बसची वाट पाहत उभा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या मुलाच्या खांद्यावर जड बॅग देखील आहे, हा मुलगा लांबून येणारी बस पाहातो आणि हात हलवून बस थांबण्याचा इशारा देतो. बस चालकालाही या मुलाचे हावभाव समजतात. बस चालकाला हेच वाटतं की हा मुलगा बसला थांबवण्यासाठी हा इशारा करतोय, ज्यामुळे बस चालक देखील आपली बस त्या मुलाच्या समोर थांबवतो, पण अखेर बसवाल्याची हा मुलगा फसवणूक करतो.
खरंतर बसच्या बाजूने एक सायकल देखील जात असते, ज्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, पण खरंतर हा मुलगा त्या सायकलवाल्याला हात दाखवत असतो असं भासवतो आणि जेव्हा बस त्याच्याजवळ थांबते, तेव्हा सायकलवर बसून हा मुलगा निघून जातो. हे सगळं हा बसवाला पाहातच राहातो आणि हा मुलगा मात्र त्याची फसवणूक करुन निघून जातो. हे ही पाहा : आगीशी खेळ अंगाशी आला, तरुणाचा स्टंट जीवावर बेतला…. Video Viral हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हे दृश्य हस्यास्पद असलं, तरी देखील असं दुसऱ्यांना त्रास देणं केव्हा ही चांगलं नाही, फक्त एका मजेदार व्हिडीओसाठी इतक्या लोकांना त्रास देणं योग्य नाही. त्यामुळे लोकांनी असं कृत्य टाळावं. कारण यामुळे फक्त बसवालाच नाही, तर बसमधील लोकांची देखील फसवणूक झाली आहे. लोकांचा वेळ खूप महत्वाचा आहे आणि तो अशा शुल्लक गोष्टींसाठी वाया घालवू नये. हा व्हिडिओ ‘जिंदगी गुलजार है’ नावाच्या युजरने सोशल मीडिया ट्विटरवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे- ‘‘भाऊ असे जोक्स कोण करतो?’’ या व्हिडीओला अनेकांना लाईक्स आणि शेअर केलं आहे. लोकांना हा व्हिडीओ मजेदार वाटत आहे, परंतू असे देखील लोक आहेत, ज्यांनी या मुलाला ट्रोल देखील केलं आहे.