जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ती अनोळखी व्यक्तीसोबत चॅट करत राहिली, पण भेटायला गेली तेव्हा चकर येऊन पडली

ती अनोळखी व्यक्तीसोबत चॅट करत राहिली, पण भेटायला गेली तेव्हा चकर येऊन पडली

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

खरंतर एक तरुणी सोशल मीडिवर एका अनोळखी व्यक्तीशी बराच काळापासून गप्पा मारत होती. ज्यामुळे त्यांची मैत्री प्रेमात बदलली, परंतू जेव्हा ही तरुणी आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली. तेव्हा मात्र तिला धक्काच बसला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 18 ऑगस्ट : आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रेम जुळू लागले आहेत. खरंतर इथे अनोळखी लोकांची ओळख होते आणि लोक हळूहळू करुन एकमेकांशी बोलू लागतात. त्यानंतर मैत्री आणि प्रेमा पर्यंत हे प्रकरण जातं. असं असलं तरी देखील सोशल मीडियावर जुळलेल्या नात्यांमध्ये फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यात आता एक असं प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तसे पाहाता हे एक मजेदार प्रकरण आहे, खरंतर एक तरुणी सोशल मीडिवर एका अनोळखी व्यक्तीशी बराच काळापासून गप्पा मारत होती. ज्यामुळे त्यांची मैत्री प्रेमात बदलली, परंतू जेव्हा ही तरुणी आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली. तेव्हा मात्र तिला धक्काच बसला, कारण तिच्यासमोर या व्यक्तीचा खरा चेहरा समोर आला होता. हे ही पाहा : कोणीतरी गिफ्ट पाठवलं म्हणून तरुणीनं आनंदानं उघडलं, पण क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं खरे तर ही घटना ऑस्ट्रेलियातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मुलगी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. तिने तिची संपूर्ण कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही तरुणी गेल्या सहा महिन्यांपासून एका डेटिंग अॅपद्वारे न्यूझीलंडमधील एकाप्रोफाइलवर ऑनलाइन डेटिंग करत होती. दरम्यान दोघांनी भेटण्याचा बेत आखला. हे ही पाहा : डोक्यावर हेल्मेट घालून बकरीवर स्वार झाला, स्टाईल मारणारा चिमुकला काही क्षणात ‘गार’ झाला… मजेदार Video यासाठी त्यांनी न्यूझीलंडमधील एका हॉटेलमध्ये जागा निश्चित केली आणि त्यानंतर दोघांची यावेळी भेट होणार असे ठरले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सहा महिन्यांत दोघांनीही एकमेकांचा आवाज ऐकला नाही आणि दोघांनीही एकमेकांना व्हिडीओ कॉलही केला नाही. जेव्हा जेव्हा तरुणीने व्हिडीओ कॉलिंगसाठी विचारले तेव्हा तेव्हा समोरुन टाळलं जात होतं. तरुणीला हे आधी विचित्र वाटले पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. भेटल्यावर नक्की काय घडलं? अखेर एक दिवस त्यांचा भेटण्याचा प्लान झाला. यानंतर ती त्याला भेटण्यासाठी न्यूझीलंडला पोहोचली. परंतू हे दोघेही जेव्हा एका हॉटेलमध्ये भेटले, तेव्हा समोरील व्यक्तीला पाहून तरुणाला धक्का बसला. खरंतर ही तरुणी ज्या व्यक्तीशी इतके दिवस मुलगा किंवा तरुण म्हणून बोलत होती ती व्यक्ती एक तरुणीच होती. जेव्हा या तरुणीने त्या मुलीला प्रश्न विचारला की तिने असं का केलं? त्यावर उत्तर देत ती मुलगी म्हणाली की मला फक्त हे चेक करायचं होतं की ती तिला भेटायला येणार आहे का. हे आपल्यालाच ऐकायला विचित्र वाटत आहे. विचार करा त्या तरुणीचं काय झालं असावं. तिचे पैसे तर गेलेच शिवाय तिला हा धक्का बसला तो वेगळाच. जेव्हा तरुणीने तिच्यासोबत घडलेली ही घटना सोशल मीडियावर शेअर केली तेव्हा नेटकऱ्यांनी याची मजा घेण्यासाठी सुरुवात केली. तर अनेकांनी तरुणीसाठी सहानभुती व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात