जाहिरात
मराठी बातम्या / Viral / डोक्यावर हेल्मेट घालून बकरीवर स्वार झाला, स्टाईल मारणारा चिमुकला काही क्षणात 'गार' झाला... मजेदार Video

डोक्यावर हेल्मेट घालून बकरीवर स्वार झाला, स्टाईल मारणारा चिमुकला काही क्षणात 'गार' झाला... मजेदार Video

Video Viral

Video Viral

डोक्यावर हेल्मेट, हातात कपडा, बकरीसोबत सैर करायला निघालेला चिमूकला धपकन पडला… पाहा मजेदार Video

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 16 ऑक्टोबर : सोशल मीडियावर आपल्याल नेहमीच असे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे मनोरंजक असतात. येथे लोक आपल्या आवडीप्रमाणे व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच सोशल मीडियावर लहान मुलांसंबंधीत देखील अनेक व्हिडीओ असतात. लहान मुलं ही निरागस असतात. त्यामुळे ते जे काही करतात ते आपल्या मनापासून करतात. त्यांच्या मनाला जे ठिक वाटेल आणि त्यांना जे सुचेल तसं ते बऱ्याचदा वागतात. कधीकधी लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण देखील करु पाहातात. लहान मुलांच्या अशा गोष्टी पाहायला लोकांना फार आवडते. सध्या यासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. खरंतर हा व्हिडीओ एका मुलाचा आहे, जो बकरीवर बसून फिरत आहेत. हो, तेही डोक्यात हेल्मेट घालून. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, या चिमुकल्याने बकरीची सैर करण्यासाठी आपलं विचित्र लॉजिक लावलं आहे. जे खपूच मजेदार आहे. हे ही पाहा : भाऊ-बहिणचा लपंडाव… पण एक ट्रीक आणि चिमुकली आऊट, क्यूट Videoनं नेटकऱ्यांना लावलं वेड नक्की काय आहे हा व्हिडीओ व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका रिकाम्या शेतात एक लहान मूल डोक्यावर हेल्मेट घालून शेळीवर बसलेले दिसत आहे. शेळीही मोठ्या आनंदाने त्यामुलाला शेतात फिरवताना दिसत आहे.

जाहिरात

लोक घोड्यावर बसतात तशाच प्रकारे हा मुलगा हेल्मेट घालून बसला आहे. मुलाची स्टाईल पाहून तुम्हाला तो जणू काही घोड्यावर बसला आहे आणि रेसिंग खेळायला जात असल्यासारखे वाटेल. हे ही पाहा : Delivery boy बिल्डिंग खाली असं काही करताना दिसला; VIDEO समोर येताच सोशल मीडियावर होऊ लागला ट्रेंड यासोबतच मुलाने बकरीच्या गळ्यात एक कपडा टाकला आहे, जेणे करुन त्याला बकरीवर बसल्यावर त्याचा अधार घेता येईल. पण अखेर त्याचा फायदा काही त्या मुलाला होत नाही आणि पुढे जाऊन तो तोल जाऊन खाली पडतो. हा व्हिडीओ पाहून खरंत तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही. ज्यामुळेच हा व्हिडीओ नेटकऱ्यांन देखील खूप आवडला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर a_k_r_16k नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर लाखो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे आणि त्यावर कमेंटही करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात