मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कोणीतरी गिफ्ट पाठवलं म्हणून तरुणीनं आनंदानं उघडलं, पण क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं

कोणीतरी गिफ्ट पाठवलं म्हणून तरुणीनं आनंदानं उघडलं, पण क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

जेव्हा एख्याद्याला भेटवस्तू मिळते, तेव्हा तो व्यक्ती खरोखरंच खूप खूश होतो. परंतू एका तरुणीसोबत एक विचित्र गोष्ट घडली. जी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल.

  • Published by:  Devika Shinde

मुंबई 16 ऑक्टोबर : सध्या ऑनलाईन गोष्टी मागवण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. खरंतर इथे लोकांना कोणतीही गोष्ट खरेदी करताना भरभरुन ऑफर्स दिल्या जातात. तसेच सणासुदीच्या काळात देखील कपड्यांपासून ते अगदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात ऑफर दिल्या जातात. ज्यामुळे बहुतांश लोक ऑनलाईन गोष्टी मोठ्या प्रमाणात मागवतात.

आपल्यासाठीच नाही तर अनेक लोक दुसऱ्यांसाठी देखील भेटवस्तू पाठवतात आणि जेव्हा एख्याद्याला भेटवस्तू मिळते, तेव्हा तो व्यक्ती खरोखरंच खूप खूश होतो. परंतू एका तरुणीसोबत एक विचित्र गोष्ट घडली. जी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल.

वास्तविक, ही घटना अमेरिकेतील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका तरुणाचं एका मुलीवर प्रेम करत होतं, पण मुलीने त्याला नकार दिला. ज्यानंतर या तरुणाने आपल्या प्रेयसीला मारण्याचा प्लान आखला. त्याने त्या तरुणीसाठी ऑनलाईन भेट वस्तू म्हणून बॉम्ब पाठवला होता. मॅकॉय असे या सरफिऱ्या आशिकचं नाव आहे.

हे ही वाचा : दिवाळीत साड्यांची खरेदी करताना फसवणूकीपासून वाचा; या Viral Video ने केली पोलखोल

नक्की काय आणि कसं घडलं?

माहितीनुसार या तरुणाने घरात बॉम्ब तयार केला आणि तो पॅक केला. मग तो बॉम्ब त्याने होम डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीमार्फत तरुणीच्या घरी पोहोचवला. जेव्हा तरुणीने हे पॅकेट उघडलं, तेव्हा स्फोट झाला आणि ती गंभीर जखमी देखील झाली आहे.

हे ही वाचा : Video : पानपट्टीच्या दुकानातील बल्बची चोरी, सीसीटीव्ही पाहाताच पानवाल्यालाही बसला धक्का

खरंतर एकतर्फी प्रेमातून हा सगळा प्रकार घडला. या तरुणाला त्या तरुणीला संपवायचं होतं, परंतू तिचं नशिब चांगलं होतं, ज्यामुळे ती बचावली आहे. परंतू या घटनेनंतर तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने संपूर्ण प्रकरण समोर आले.

पोलिसांनी मुलीच्या वक्तव्याच्या आधारे तपास केला असता, पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली. बॉम्बस्फोटाची घटना थोडी जुनी आहे पण आता या घटनेचा निकाल आला असून आरोपी शिक्षा झाली आहे.

First published:

Tags: Online shopping, Shocking news, Top trending, Viral