मराठी बातम्या /बातम्या /Viral /Viral Video: ...अन् लग्नातच दिरांनी वहिनीला घेरलं; नवरीचं असं स्वागत तुम्ही कधीच पाहिलं नसेल

Viral Video: ...अन् लग्नातच दिरांनी वहिनीला घेरलं; नवरीचं असं स्वागत तुम्ही कधीच पाहिलं नसेल

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर लग्नातील एक रील्स व्हिडिओ (Instagram Reels) ट्रेंड करत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका नव्या नवरीच्या बाजूने तिचे दीर उभा आहेत

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर लग्नातील एक रील्स व्हिडिओ (Instagram Reels) ट्रेंड करत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका नव्या नवरीच्या बाजूने तिचे दीर उभा आहेत

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर लग्नातील एक रील्स व्हिडिओ (Instagram Reels) ट्रेंड करत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका नव्या नवरीच्या बाजूने तिचे दीर उभा आहेत

नवी दिल्ली 10 जुलै : सोशल मीडियावर लग्नसमारंभातील व्हिडिओ (Wedding Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. लग्न म्हणजे केवळ नवरदेव आणि नवरी (Bride and Groom) नाही तर दोन्ही कुटुंबीयांचंही एक होणं असतं. यातून अनेक नवीन नाती निर्माण होतात. यातीलच एक खास नातं आहे दीर आणि वहिनीचं. या नात्यात प्रेम, एकमेकांचा आदर आणि थोडी मस्करीही असते. सध्या व्हायरल झालेला एक व्हिडिओदेखील (Video Viral on Social Media) असाच काहीसा आहे.

या टॉयलेटमध्ये जाणाऱ्यांना दिले जातात पैसे; उद्देश ऐकून लावाल डोक्याला हात

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर लग्नातील एक रील्स व्हिडिओ (Instagram Reels) ट्रेंड करत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका नव्या नवरीच्या बाजूने तिचे दीर उभा आहेत. हे तरुण आपल्या वहिनीच्या आजूबाजूला उभा राहून एका गाण्यावर डान्स करत (Devar Bhabhi Dance Video) आहेत. सासरी झालेलं हे खास स्वागत पाहून वहिनीदेखील आनंदी झाल्याचं दिसत आहे.

बापरे! भरधाव कारवर अजगरानं घेतली उडी अन्...; पाहा घटनेचा Shocking Video

दीर या लग्नात अगदी मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. तर, वहिनीदेखील त्यांच्यासोबत मध्ये मध्ये आपल्या डान्सची झलक दाखवत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'दुल्हनिया' (Dulhaniyaa) नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दीर आणि वहिनीचं नातं खरंच खूप खास असतं. या वहिनीचं तिच्या दिरांसोबत असलेलं बॉन्डिंग लोकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. हा व्हायर व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 15 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

First published:

Tags: Bride, Dance video, Viral videos