मराठी बातम्या /बातम्या /Viral /कायच्या काय! या टॉयलेटमध्ये जाणाऱ्यांना दिले जातात पैसे; उद्देश ऐकून लावाल डोक्याला हात

कायच्या काय! या टॉयलेटमध्ये जाणाऱ्यांना दिले जातात पैसे; उद्देश ऐकून लावाल डोक्याला हात

या टॉयलेटचं नाव BeeVi ठेवलं गेलं आहे. हे इकोफ्रेंडली आहे. या टॉयलेटमध्ये कमी पाण्याची गरज पडते.

या टॉयलेटचं नाव BeeVi ठेवलं गेलं आहे. हे इकोफ्रेंडली आहे. या टॉयलेटमध्ये कमी पाण्याची गरज पडते.

या टॉयलेटचं नाव BeeVi ठेवलं गेलं आहे. हे इकोफ्रेंडली आहे. या टॉयलेटमध्ये कमी पाण्याची गरज पडते.

सियोल 10 जुलै : एका अशा टॉयलेटबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याचा वापर केल्यानंतर लोकांना पैसे मिळतात (People Are Getting Paid to Use Toilet). यामागचं कारण ऐकून तुम्हीही नक्कीच हैराण व्हाल. हे टॉयलेट साउथ कोरियामधील (South Korea) असून उल्सन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीच्या प्राध्यापकांनी ते डिझाईन केलं आहे. या टॉयलेटमधील विष्ठेतून वीज तयारी केली जाते.

हे स्पेशल टॉयलेट (Special Toilet) उल्सन विद्यापीठाच्या कँपसमध्ये बनवलं गेलं आहे. जे विद्यार्थी या टॉयलेटचा वापर करतात त्यांना डिजिटल करन्सी Ggool चे 10 यूनिट मिळतात. या पैशांनी विद्यार्थी फळे, वह्या-पुस्तकं आणि खाण्या-पिण्याच्या वस्तू विकत घेता येतात.

दिवसा मुलीचा तर रात्री तिच्याच आईचा पती होतो हा व्यक्ती; कारण ऐकून बसेल धक्का

या टॉयलेटचं नाव BeeVi ठेवलं गेलं आहे. हे टॉयलेट इकोफ्रेंडली आहे. या टॉयलेटमध्ये कमी पाण्याची गरज पडते. व्हॅक्यूमच्या मदतीनं विष्ठा अंडरग्राऊंड टँक आणि मग बायोरिअॅक्टरमध्ये नेण्यात येते. काही लोक या टॉयलेटला सुपर वॉटर सेव्हिंग व्हॅक्यूम टॉयलेटही म्हणत आहेत.

जगातील असं शहर जिथे कपडे घालण्यास आहे मनाई; मात्र रोमान्स केल्यास मोठा दंड

मलामध्ये असणारा मॅथेन गॅस इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्ट केला जातो. यातूनच विद्यापीठातील विजेची गरज भागवली जाते. सध्या हा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे. उल्सनच्या एका विद्यार्थ्यानं सांगितलं, की BeeVi मुळे आम्हाला आमच्या विष्ठेसाठीही पैसे मिळू लागले. यातून वीज बनवली जाते. टॉयलेटचा वापर केल्यानंतर मिळालेल्या पैशातून अनेक गरजेच्या वस्तू विकत घेतल्याचं त्यानं सांगितलं.

First published:

Tags: Social media viral, Viral news