जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हिला कोणीतरी आवरा! दारुची बाटली हातात घेऊन तरुणीनं घातला धुमाकूळ, व्हायरल होतोय VIDEO

हिला कोणीतरी आवरा! दारुची बाटली हातात घेऊन तरुणीनं घातला धुमाकूळ, व्हायरल होतोय VIDEO

हिला कोणीतरी आवरा! दारुची बाटली हातात घेऊन तरुणीनं घातला धुमाकूळ, व्हायरल होतोय VIDEO

एखादी मुलगी लग्नात दारू पिऊन डान्स करताना आपण फारच कमी वेळा पाहिलं असेल. मात्र, सध्या इन्स्टाग्राम रिल्सवर असाच एक व्हिडिओ (Instagram Reels Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 ऑगस्ट : लग्नसमारंभात नवरदेवाचे मित्र अनेकदा दारू पिऊन डान्स (Wedding Dance) करताना दिसतात. इतकंच नाही तर अनेकदा काही लोक दारू पिऊन लग्नातील डीजे फ्लोरवरही डान्स करू लागतात. या घटनांचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होतात. मात्र, एखादी मुलगी लग्नात दारू पिऊन डान्स करताना आपण फारच कमी वेळा पाहिलं असेल. मात्र, सध्या इन्स्टाग्राम रिल्सवर असाच एक व्हिडिओ (Instagram Reels Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Emoji चा रंग पिवळाच का असतो? जाणून घ्या इतिहास आणि कारण इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की लग्नसमारंभामध्ये डीजे फ्लोरवर एक मुलगी दारूची बाटली घेऊन डान्स करू लागते. या तरुणीचा डान्स पाहून जाणवतं की तिनं दारू प्यायली आहे. मात्र, प्रत्यक्षात असं नाही. कारण ही तरूणी केवळ दारूड्याचं नाटक करत आहे. या तरुणीचा डान्स पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी तिच्यावर पैसेही उडवले.

जाहिरात

नवरा-नवरीच्या मध्ये ‘हे’ काय? स्टेजवर जे दिसलं ते पाहून तुम्ही व्हाल शॉक सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंतीही मिळत आहे. इन्स्टाग्रामवर स्माइल अरोडा ऑफिशियल या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एक लाखाहून अधिकांनी लाईक केला आहे. इतकंच नाही तर हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, की असा डान्स कधी कोणत्या फॅमिली फंग्शमध्ये केला आहे का ? या व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात