मराठी बातम्या /बातम्या /Viral /Emoji चा रंग पिवळाच का असतो? जाणून घ्या इतिहास आणि कारण

Emoji चा रंग पिवळाच का असतो? जाणून घ्या इतिहास आणि कारण

इमोजी पिवळ्या रंगाचीच का असतात?

इमोजी पिवळ्या रंगाचीच का असतात?

सध्याच्या काळात आपल्या भावना, मतं आणि वैयक्तिक घडामोडी शेअर करण्याचं महत्वाचं साधन म्हणजे सोशल मीडिया (Social Media). आता छोटोशी चित्रे देखील सोशल मीडियावर शेअर केली जातात. ही छोटीशी पण परिणामकारक चित्रं म्हणजेच इमोजी (Emoji).

  मुंबई, 14 ऑगस्ट : सध्याच्या काळात आपल्या भावना, मतं आणि वैयक्तिक घडामोडी शेअर करण्याचं महत्वाचं साधन म्हणजे सोशल मीडिया (Social Media). फेसबुक, इन्स्टाग्राम असो किंवा व्हॉट्सॲप तसेच तत्सम अॅप या माध्यमातून आपण मित्र, नातेवाईकांच्या संपर्कात असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या विषयावर आपलं मत व्यक्त करताना किंवा भावना व्यक्त करताना ते कमी शब्दांत आणि नेमकेपणाने पोहोचवण्याकडे आपला कल असतो. यामुळे आज सोशल मीडिया अॅपवर आपण अनेक शब्दांचे शॉर्ट फॉर्म (Short form) प्रचलित झाल्याचे पाहतो. मात्र या शॉर्टफॉर्मसोबतच आता छोटोशी चित्रे देखील सोशल मीडियावर शेअर केली जातात. ही छोटीशी पण परिणामकारक चित्रं म्हणजेच इमोजी (Emoji). या इमेज मागील इतिहास नेमका काय आहे? याचा वापर कुठे आणि कसा सुरु झाला आणि या इमोजींचा रंग पिवळाच का असतो या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

  सध्या फोनवर कॉलिंगसोबत चॅटिंगकडेही कल वाढताना दिसतो. चॅटिंगमध्ये (Chatting) आपल्या भावना, मतं व्यक्त करण्यासाठी आता बहुतांश लोक शब्दांऐवजी इमोजीचा प्राधान्याने वापर करताना दिसतात. परंतु, या इमोजीचा रंग पिवळाच (Yellow) का असतो, याबाबत बऱ्याच लोकांना फारसे माहिती नाही. केवळ फोनवरीलच नाही तर स्माईली खेळण्यांमधील इमोजीचा रंग पिवळा असतो.

  जपानमधील (Japan) डिझाईनर शिगेताका कुरिता यांनी वयाच्या 25 व्या वर्षी प्रथम इमोजी साकारला. 1999 मध्ये त्यांनी इमोजीचे 176 सेट तयार केले. हे इमोजी लोकांच्या पसंतीस उतरले त्यामुळे न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ आर्ट येथे ते कायमस्वरुपी जतन करण्यात आले. इमोजीपिडीयाचे संस्थापक जेरेमी बर्ग यांच्या कार्याची ओळख जगाला व्हावी यासाठी 17 जुलैला वर्ल्ड इमोजी डे (World Emoji Day) साजरा केला जातो. 2014 मध्ये सर्वप्रथम हा वर्ल्ड इमोजी डे साजरा केला गेला.

  दरम्यान, इमोजी वापराची सुरुवात 1963 पासून झाल्याचे मानले जाते. एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वप्रथम इमोजीचा वापर केला गेला. एक वेळ अशी होती की स्टेट म्युचअल लाइफ इन्शुरन्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावेळी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी एका ग्राफिक डिझायनरची (Graphic Designer) नेमणूक करण्यात आली. या डिझायनरने एक सिम्बॉल (Symbol) तयार केला. हा सिम्बॉल पिवळ्या रंगाचा होता आणि त्यावर एक छोटीशी स्माइली होती. या सिम्बॉलचा कर्मचाऱ्यांवर परिणाम झाल्याचे दिसून आले आणि तो चर्चेत आला. पहिल्यांदा जेव्हा इमोजी तयार केला गेला तेव्हापासून आजपर्यंत त्याचा रंग पिवळाच आहे. हॅप्पी फेससाठी (Happy Face) पूर्वी याचा वापर केला जात असे.मात्र आता अनेक प्रकारचे इमोजी आले आहेत. यापूर्वी केवळ आनंद दर्शवण्यासाठी इमोजीचा वापर केला जात असे आणि त्यावर व्यक्तीच्या चेहऱ्याचे भाव असत.

  इमोजीच्या पिवळ्या रंगाविषयी अजून सविस्तर पाहिलं तर यामागे अनेक तर्क (Logic) सांगितले जातात. यापैकी एक तर्क असा की चेहऱ्याचा रंग पिवळाच निवडला गेला कारण तो वर्णभेदा पेक्षा निराळा आहे. तो गोरा किंवा काळा या रंगापेक्षा वेगळा आहे. पिवळा रंग हा आनंदाशी निगडीत आहे. याचा संबंध सूर्याशी (Sun) असून, तो आनंदाचे प्रतीक मानला जातो. पिवळा रंग आकर्षक असून तो ऊर्जादायी देखील आहे. त्यामुळे इमोजीत पिवळ्या रंगाचा वापर केला जातो.

  एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी ट्विटरवर (Twitter) 2021 मध्ये डोळ्यांमधून प्रेमाची बरसात करणाऱ्या इमोजीचा सर्वाधिक वापर केला गेला. त्यानंतर यावर्षी लोकांनी ट्विटरच्या माध्यमातून दुःख, वेदना अधिक प्रमाणात व्यक्त केल्या. त्यामुळे 2021 रडणं दर्शवणाऱ्या इमोजीचा वापर ही मोठ्या प्रमाणात झाला. 2021 मध्ये लोकं एकमेकांकडे औषधे, दवाखाने, इंजेक्शनबाबत मदत मागताना दिसून आले. त्यामुळे प्लिडिंग फेस इमोजीचा वापर देखील लक्षणीय प्रमाणात झाला.

  First published:

  Tags: Social media