Home /News /viral /

नवरा-नवरीच्या मध्ये 'हे' काय? स्टेजवर जे दिसलं ते पाहून बसेल शॉक

नवरा-नवरीच्या मध्ये 'हे' काय? स्टेजवर जे दिसलं ते पाहून बसेल शॉक

नवरा, नवरी आणि तो...

नवरा, नवरी आणि तो...

लग्नात स्टेजवर असं काही घडलं की...

  मुंबई, 13 ऑगस्ट :  लग्नात (Wedding) मजामस्तीसह काही शॉकिंग घटनाही घडताना दिसताच. सध्या अशाच एक लग्नातील (Wedding video)  शॉकिंग घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. पण जेव्हा या शॉकिंग व्हिडीओमागील सत्य तुम्हाला समजेल तेव्हा मात्र तुम्हाला हसू आवरणार नाही. नवरा-नवरीच्या (Bride groom video) मध्ये असं काहीतरी दिसलं की सुरुवातीला तुम्हाला धक्काच बसेल. नवरा-नवरी यांच्यामध्ये लग्नाचे विधी सुरू होते. त्यांनी एकमेकांना वरमाला घातल्या. त्यानंतर स्टेजवर असं काही घडलं की नवरा-नवरी बाजूला राहिले आणि सर्वांचंच लक्ष तिथं गेलं.
  नवरा-नवरीने एकमेकांना वरमाला घातल्यानंतर त्यांच्यामध्ये एक तिसरं कुणीतरी दिसलं. त्यांच्या पायाजवळ कुणीतरी असल्याचं दिसलं. हे वाचा - वरात दारात, नवरी जोमात! नवरदेवाला पाहताच झाली सैराट; VIDEO VIRAL नवरा-नवरीच्या मध्ये दोघात तिसरा आला. तो तिसरा थोडा वेळ तिथं होता आणि लगेच गायब झाला. व्हिडीओ नीट पाहिला तर हा तिसरा म्हणजे चक्क फोटोग्राफर असल्याचं तुम्हाला समजेल. व्हिडीओ पाहताना काही वेळा हे काय आहे, पाहूनच धडकी भरते. पण नंतर जेव्हा फोटोग्राफर या अँगलने फोटो काढण्यासाठी तिथं असा आडवा झाला होता, हे समजतं तेव्हा मात्र हसू बिलकुल आवरत नाही. हे वाचा - अरे हिला आवरा! लग्नादिवशीच दारू ढोसतेय नवरी; VIDEO VIRAL निरंजन महापात्रा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या