ठाणे 17 सप्टेंबर : आजही देशात अशी अनेक गावे आहेत जिथे लोकांना साध्या किंवा जीवनावशक सुविधा मिळत नाही. तसेच येथील विद्यार्थांना शाळेत जाण्यासाठी देखील खूपच संघर्ष करावा लागतो. एकतर गावाकडे शाळा लांब असतात, म्हणजेच पुढचं किंवा चांगलं शिक्षण घेण्याचा विचार केला, तर तेथे प्रवास करणं खूपच कठीण होऊन बसतं. अनेक गावात तर मोठ-मोठी नदी पार करुन देखील अनेक मुलांना शाळेत जावं लागतं आणि जर पुल नसेल, मग तर हे काम फार जोखमीचं होऊन बसतं. तसे पाहाता अनेक किलोमीटर दूर जाऊन शिक्षण घेणे हे फार कठीण काम आहे. पण, दरम्यानच्या काळात चांगली गोष्ट म्हणजे लोकांमध्ये शिक्षणाबाबत जागरुकता निर्माण झाली आहे आणि हे लोकांच्या कामातून किंवा वागणूकितून दिसून आलं आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील पालट पाडा गावाची अशीच एक कहाणी आहे, ज्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून अगदी जवळ असलेलं हे गाव समस्यांनी भरलेले आहे. तलावाच्या काठावर वसलेल्या या गावात रस्ता नाही. गावात शाळा नसल्याने मुलांना शाळेत जाण्यासाठी एक किलोमीटरचा तलाव पार करावा लागतो. परंतू त्याच गावातील कांता चिंतामण या १९ वर्षीय तरुणीने आजपर्यंत जे सरकार करू शकले नाही ते करून दाखवलं आहे. या तरुणीने शिक्षणाचं महत्व लक्षात घेता मुलांना तलाव ओलांडण्यासाठी एक बोट बनवली आणि ती या बोटीतून त्या मुलांना घेऊन जाते. ते ही त्यांच्याकडून एकही पैसा न घेता. हे वाचा : ती तरुणासमोर प्रेमानं येऊन उभी राहिली, पण त्यानंतर तिनं जे केलं; ते धक्कादायक, पाहा VIDEO गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे ती स्वत: निरक्षर राहिल्याची कांताला आजही खंत आहे. इयत्ता 9वीत असताना तिची शाळा चुकली. तिला शाळेत घेऊन जाणारे कोणी नव्हते. तसेच कोणतीही बोट नव्हती. तसेच शिक्षणाची कोणालाच पर्वा नव्हती. शाळा सोडल्यानंतर पाच वर्षांनी कांताने गावातील मुलांसाठी मोफत बोट सेवा सुरू केली. जेणेकरून गावातील मुले अशिक्षित राहू नयेत. या छोट्या गावात 25 कुटुंबे राहतात. शेती आणि मासेमारी करून हे लोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आदिवासी समाजातील लोक वर्षानुवर्षे येथे राहतात. मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या गावाची दयनीय अवस्था कायम आहे. हे वाचा : 43 वर्षांत 53 वेळा लग्न, व्यक्तीच्या नावे अनोखा विक्रम, या मागचं कारण ऐकाल तर चकित व्हाल गावात शाळा किंवा दवाखाना नाही, रुग्ण किंवा गर्भवती महिलेला दवाखान्यात दाखल करावे लागल्यास बोटीने न्यावे लागते. अहवालानुसार या गावात अद्याप वीज पोहोचलेली नाही. आजपर्यंत एकही डॉक्टर या गावात वैद्यकीय शिबिर नसल्याने फिरकला नाही. परंतू असं असूनही 19 वर्षीय कांता चिंतामण हिच्यामध्ये असलेली जिद्द आज इतरांसाठी एक उदाहरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.