मुंबई 17 सप्टेंबर : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्न ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. कारण त्यामुळे नवरा-बायको दोघांच्याही आयुष्याची नवीन सुरूवात होते. लग्नामध्ये नवरा-बायको एकमेकांसोबत सात जन्म राहाण्याची शपथ घेतात, तसेच आयुष्यातील प्रत्येक सुख दु:खात एकमेकांना साथ देण्याचं देखील वचन देतात. परंतू एका अशा व्यक्तीची बातमी समोर आली आहे, ज्यानं लग्नाला जणू काही खेळचं समजलं आहे. या व्यक्तीच्या कृत्याबद्दल तुम्ही ऐकाल तर तुम्हाला धक्काच बसेल. खरंतर या व्यक्तीने 43 वर्षांत 53 वेळा लग्न करण्याचा ‘विक्रम’ केला आहे. बसला ना धक्का? तुम्ही हे कितीही अशक्य वाटत असलं, तरी हे शक्य आहे. हे असं कृत्य करण्यामागे या व्यक्तीने कारणही सांगितलं आहे आणि ते कारण त्यानं केलेलया कृत्यापेक्षाही आणखी धक्कादायक आहे. इतकी लग्न करण्याचं कारण देत ही व्यक्ती म्हणाली की, तिने शांततेच्या शोधात हे लग्न केलं आहे. या व्यक्तीचा दावा आहे की, तिने वैयक्तिक आनंद नव्हे तर ‘स्थिरता’ आणि मन:शांती मिळवण्याच्या उद्देशाने 53 वेळा लग्न केले आहे. अबू अब्दुल्ल असे या 63 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीला सर्वात जास्त लग्न करणाऱ्या पुरुषाच्या नावानं देखील ओळखलं जातं. इतकी लग्न करण्यामागची कहाणी सांगत अबू अब्दुल्ल म्हणाला की, “मी या संपूर्ण कालावधीत 53 महिलांशी लग्न केलं. मी पहिले लग्न केले तेव्हा मी 20 वर्षांचा होतो आणि ती (पत्नी) माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी होती,” पुढे तो म्हणाला, “जेव्हा मी पहिल्यांदा लग्न केले, तेव्हा एकापेक्षा जास्त महिलांशी लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. कारण तेव्हा मला आरामदायक वाटले आणि मला मुले झाली. मात्र, काही वर्षांनी नात्यात अडचणी निर्माण झाल्या आणि मी वयाच्या 23 व्या वर्षी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला.” हे वाचा : ‘हा’ छोटा छिद्र खूपच कामाचा, फोन खाली असलेला या छिद्राचं काम ऐकून तुम्ही चकित व्हाल त्याने आपल्या पहिल्या पत्नीला आपला निर्णय सांगितला आणि पहिली पत्नीनं ते मान्य देखील केलं. पण अखेर पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये वाद झाला तेव्हा अब्दुल्लाने तिसऱ्या आणि चौथ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. नंतर त्याने आपल्या पहिल्या दोन पत्नींना घटस्फोट दिला. अब्दुल्ला म्हणाला की, त्याच्या अनेक विवाहांचे साधे कारण म्हणजे त्याला आनंदी ठेवणारी स्त्री शोधणे. तो म्हणाला की त्याने आपल्या सर्व पत्नींशी प्रामाणिक राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतू महिलांचं वागणं आणि आपापास भांडणं त्याला पटत नव्हतं, त्याला आयुष्यात शांती हवी होती. अखेर मग त्याने वेगवेगळं लग्न करण्याचा विचार केला. हे वाचा : ती तरुणासमोर प्रेमानं येऊन उभी राहिली, पण त्यानंतर तिनं जे केलं; ते धक्कादायक, पाहा VIDEO अब्दुल्ला ने सांगितलं की त्याच्या 53 लग्नापैकी सगळ्यात कमी काळ टिकलेलं लग्न हे फक्त एका रात्री पूर्त होतं. 63 वर्षीय अब्दुल्ला यांनी बहुतांश सौदी महिलांशी लग्न केले असले तरी, त्यांनी परदेशातील व्यावसायिक प्रवासादरम्यान देखील विदेशी महिलांशी विवाह केल्याचे मान्य केले आहे. आता नुकतंच अब्दूल्ला ने एक लग्न केलं आहे आणि त्यानंतर लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं अब्दुलाने सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.