मुंबई 4 सप्टेंबर : अपघातासंदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असेल, हे अपघाताचे व्हिडीओ आपल्या संवेदना उडवतात. कधी चालकाच्या चूकीमुळे तर कधी समोरील व्यक्तीच्या चुकीमुळे हे अपघात घडतात. ज्यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमचा थरकाप उडेल. भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी व्हीसी सज्जनार यांनी गुरुवारी ट्विटरवर ही क्लिप शेअर केली. हा व्हिडीओ शेअर करताना अधिकाऱ्याने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले की, नागरिकांच्या रस्ता सुरक्षेला किती काळ हलक्यात घेतली जाईल आणि लोकांना नेहमीच त्यांच्या नशिबावर अवलंबून राहावं लागेल? त्यांनी लिहिले, “थोडक्यातच बचावले. पण किती दिवस नशिबावर अवलंबून राहायचे? रस्त्यावर जबाबदार राहा.” अधिकाऱ्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यस्त रस्ता दिसत आहे, ज्यामध्ये एक महिला रस्ता ओलांडताना दिसत आहे. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला एक ऑटोही उभी दिसतो, ज्यामध्ये चालक बसलेला असतो. हे वाचा : स्टाईल दाखवण्याच्या नादात रस्त्याच्या मधोमध घडला असा अपमान, आता आयुष्यभर विसरणार नाही ही व्यक्ती दरम्यान, काही क्षणांनंतर एक पांढऱ्या रंगाची भरधाव कार मागून ऑटोला धडकताना दिसते. अपघातात ऑटो पलटी होते. तर ती कार समोर जाऊन आदळते. पण या महिलेचं नशीब इतकं चांगलं असतं की, ती या सगळ्यातून वाचते. ती कार आणि ऑटोमधील छोट्या गॅपमधून थोडक्यात बचावते.
Narrow escape but how long do we depend on luck?
— V.C. Sajjanar, IPS (@SajjanarVC) September 1, 2022
Be responsible on Roads #RoadSafety pic.twitter.com/JEck2aXIuK
हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. जो पाहून लोकांना रस्त्यावर जबाबदारपणे वागण्याचे आणि कायदे कठोर करण्याचे आवाहन केले आहे. लोक आपल्या जवळच्या लोकांना देखील हा व्हिडीओ पाठवून त्यांना अलर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे वाचा : हे वाचा : Video : वेळ वाचवण्यासाठी एस्केलेटरवरून सोडली बॅग, खाली उभ्या असलेल्या महिलेसोबत भयंकर घडलं खरंतर रस्ते आपघात हे प्रकरण फारच गंभीर होऊ लागलं आहे. आज म्हणजे रविवारी देखील असाच प्रकार घडला. या अपघातात टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा पालघर येथे अपघातात मृत्यू झाला आहे. या वृत्तामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे हा अपघात घडला. हे प्रकरण लक्षात घेता. लोकांनी गाडी चालवताना आणि रस्त्यावरुन चालताना किती अलर्ट राहण्याची गरज आहे. हे लक्षात येत आहे.