अहमदाबाद 19 जुलै : मुंबईमध्ये पावसानं (Mumbai Rain) मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. यामुळे रविवारी घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांनी प्राण गमावले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एक तीन मजली इमारत कोसळली (Building Collapsed) आहे. मात्र, सुदैवानं यात कोणातीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना गुजरातच्या (Gujarat) गिर सोमनाथमधील वेरावल इथे घडली आहे. VIDEO : नवरीचा चेहरा पाहताच हादरला नवरदेव; वरमाळा फेकून देत काढला मंडपातून पळ मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना घडली तेव्हा या घरामध्ये दोन कुटुंबातील 12 सदस्य होते. मात्र, प्रसंगावधान राखत या सर्वांना वेळीच सुखरूप घराबाहेर काढण्यात आलं. त्यामुळे, घटनेत जीवितहानी टाळणं शक्य झालं आहे, ही दिलासादायक बाब आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील (Video Shows Moment of Building Collapse) समोर आला असून यात घटनेचा थरार अनुभवायला मिळतो.
क्षणार्धात जमिनदोस्त झाली तीन मजली इमारत; पाहा भयानक घटनेचा LIVE VIDEO pic.twitter.com/EjJSnSTw1c
— News18Lokmat (@News18lokmat) July 19, 2021
लेडी बाहुबली! पाठीवर सिलेंडर आणि मुलाला घेत महिलेचं Exercise; VIDEO व्हायरल जवळच असणाऱ्या एका घरामध्ये खड्डा खाणला जात होता. याच कारणामुळे या घरालाही त्याचे हादरे बसले आणि यातच घराचा पाया कमकुवत झाला आणि इमारत कोसळली, अशी माहिती समोर आली आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की कशाप्रकारे क्षणभरातच ही इमारत जमीनदोस्त होते. घटनेचा हा थरारक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.