नवी दिल्ली 19 जुलै: लग्नसमारंभादरम्यान (Marriage Function) अनेकदा अशा काही घटना घडताता ज्यावर विश्वास ठेवणंही अवघड जातं. सोशल मीडियावर (Social Media) दररोज लग्नसमारंभातील निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडिओ अत्यंत मजेशीर असतात, नवरी अन् नवरदेव मंडपातच असं काही करतात की सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. तर, अनेकदा परिस्थिती अत्यंत गंभीर होते आणि लग्नही मोडतं. सध्या लग्नसमारंभातील असाच एक हैराण करणारा व्हिडिओ (Wedding Video) समोर आला आहे. VIDEO: मास्कशिवाय ट्रेनमध्ये चढणाऱ्याला तरुणींनी घडवली अद्दल; आधी धक्का, मग…. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की लग्नाच्या मंडपात नवरी बसलेली आहे. इतक्यात नवरदेव नवरीच्या भांगात कुंकू भरण्यासाठी उभा राहतो. नवरीसोबत घरातील इतरही लोक तिथे असतात. नवरदेव उभा राहताच नवरीला काहीतरी त्रास होण्यास सुरुवात होते आणि ती जमिनीवर कोसळते. हे पाहून नवरदेव अतिशय वैतागल्याचं पाहायला मिळतं.
बापरे! कधी केळी तर कधी फुग्यात बदलतो हा माणूस; VIDEO पाहून व्हाल थक्क व्हिडिओमध्ये दिसतं की नवरीची हालत पाहून नवरदेव प्रचंड वैतागतो. यानंतर तो गळ्यातील वरमाळा काढून फेकून देतो. इतकंच नाही तर लग्नाच्या मंडपातूनही तो पळ काढतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, नवरीला नेमकं काय झालं हे समजू शकलेलं नाही. हा व्हिडिओ निरंजन महापात्रानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत 12 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.