जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लेडी बाहुबली! पाठीवर सिलेंडर आणि मुलाला घेत महिलेचं Exercise; VIDEO होतोय व्हायरल

लेडी बाहुबली! पाठीवर सिलेंडर आणि मुलाला घेत महिलेचं Exercise; VIDEO होतोय व्हायरल

लेडी बाहुबली! पाठीवर सिलेंडर आणि मुलाला घेत महिलेचं Exercise; VIDEO होतोय व्हायरल

सोशल मीडियावर लेडी बाहुबलीच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या या तरुणीचे व्हिडिओ तुम्हीही बघतच राहाल. ही तरुणी इतके अवघड एक्सरसाइज करते जे कोणालाही करणं शक्य नाही

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 19 जुलै : फिट राहण्यासाठी आजकाल पुरूष असो किंवा महिला सगळेच जिमसाठी जातात. अनेक लोक घरीच वर्कआऊट किंवा योगा करतात. मात्र, सध्या व्हायर झालेल्या व्हिडिओमध्ये (Exercise Video) एका महिलेनं जे काही केलं ते पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. आता तुम्ही असा विचार करत असाल की या महिलेनं असं नेमकं काय केलं? सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका फिटनेस फ्रिक तरुणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. ही तरुणी कधी सिलेंडर उचलून वर्कआऊट (Workout) करते, तर कधी ट्रॅक्टर ओढून. बापरे! कधी केळी तर कधी फुग्यात बदलतो हा माणूस; VIDEO पाहून व्हाल थक्क सोशल मीडियावर लेडी बाहुबलीच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या या तरुणीचे व्हिडिओ तुम्हीही बघतच राहाल. ही तरुणी इतके अवघड एक्सरसाइज करते जे कोणालाही करणं शक्य नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक मुलगी अत्यंक वजनदार असं गॅस सिलेंडर आपल्या पाठीवर ठेवते आणि व्यायाम करते. यापेक्षा अधिक हैराण करणारी बाब म्हणजे प्लँक करताना तिनं सिलेंडरसोबतच आपल्या पाठीवर एका मुलालाही उभा केलं आहे. इतका कठीण व्यायाम ती अत्यंत सहजपणे करत आहे. तिला काहीही त्रास होत नाहीये.

जाहिरात

Triplets भावांमध्ये तब्बल 7 वर्षांचं अंतर; आईच्या गर्भातून निघायला इतका वेळ? हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क झाला असाल. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ shaili_chikara नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोक केवळ व्हिडिओ एकमेकांना शेअर करत नाहीयेत. तर सोबतच यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात