• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • रस्त्यावरच दोघींमध्ये सुरू झालं भांडण; अक्षरशः केसाला धरून झाडूनं धुतलं, पाहा Viral Video

रस्त्यावरच दोघींमध्ये सुरू झालं भांडण; अक्षरशः केसाला धरून झाडूनं धुतलं, पाहा Viral Video

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Viral Video) वेगळा आहे. यात दोन महिला रस्त्यावर भांडण करताना दिसत आहेत

 • Share this:
  नवी दिल्ली 15 ऑगस्ट : महिलांची भांडणं (Women Fight) अनेकदा केवळ तिथल्या परिसरात नाही तर सोशल मीडियावरही (Social Media) चर्चेचा विषय ठरतात. आजपर्यंत तुम्ही आपल्या हॉस्टेलमध्ये किंवा पीजीमध्ये रुम शेअर करण्याऱ्या मुलींची कॅट फाईट अनेकदा पाहिली असेल, मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Viral Video) वेगळा आहे. यात दोन महिला रस्त्यावर भांडण करताना दिसत आहेत. त्यांची ही भांडणं पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी जमली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. VIDEO : 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला बंदोबस्तादरम्यान पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर भांडणाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Women Fighting Video) झाला आहे. अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा भांडणांचं कारण समजलेलं नसतं, मात्र तरीही हे व्हिडिओ पाहण्यात अनेकांना रस असतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांसोबत भांडण करत आहेत. एकीच्या हातात सिंक वाला झाडू आहे आणि ती याच झाडूनं समोरच्या महिलेला मारत आहे.
  ज्या महिलेच्या हातात झाडू आहे, ती समोरच्या महिलेवर भारी पडत आहे. दुसरी महिला फक्त स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आसपास उभा असलेले लोक फक्त उभा राहून या दोघींना भांडताना पाहत आहेत. इतक्यात तिथे एका तिसऱ्या महिलेची एण्ट्री होते. तिच्यासोबत एक लहान मुलगीदेखील आहे. ही महिला मध्ये येऊन दोघींना थांबवते आणि शांत असलेल्या महिलेला मिठीत घेऊन तिला सावरण्याचा प्रयत्न करते. झुलता झुलता एकावर एक बसत गेले आणि तुटला झोपाळा; पुढे काय घडलं पाहा VIDEO हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी असं म्हटलं आहे, की हा एखाद्या सिनेमातील शूटींगचा (Movie Shooting) भाग वाटत आहे. तर, काहींचं असं म्हणणं आहे, की या महिला ओव्हरअॅक्टींग करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: