मराठी बातम्या /बातम्या /Viral /झुलता झुलता एकावर एक बसत गेले आणि तुटला झोपाळा; पुढे काय घडलं पाहा VIDEO

झुलता झुलता एकावर एक बसत गेले आणि तुटला झोपाळा; पुढे काय घडलं पाहा VIDEO

एकमेकांच्या खांद्यावर बसून झुला झुलत गेले आणि...

एकमेकांच्या खांद्यावर बसून झुला झुलत गेले आणि...

एकमेकांच्या खांद्यावर बसून झुला झुलत गेले आणि...

मुंबई, 14 ऑगस्ट : झोपाळ्यावर (Swing) झुलायला कुणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच झोपाळा आवडतो. पूर्वी झाडावर झोपाळा (Swing on tree) बांधून उंच उंच उडण्याची मजा घेतली जायची. अशाच झाडावरच्या एका झोपाळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात झोपाळ्यावर मुलांनी स्टंट (Stunt on swing) करण्याचा प्रयत्न केला आहे (Children fell from swing).

एकमेकांच्या शेजारी बसून किंवा एक खाली बसलेला आणि एक उभा असं झोपाळ्यावर दोघांना झुलताना पाहिलं असेल. पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत मुलांनी चक्क एकमेकांवर बसून झोपाळा झुलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पुढे काय घडलं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

व्हिडीओत पाहू शकता. एका झाडाला दोरी बांधून त्याचा झोपाळा केला आहे. तर झाडाच्या कडेला एक शिडीही लावण्यात आली आहे, ज्यावर काही मुलं उभी आहेत.

हे वाचा - OMG! आईस्क्रिम खाता खाता बायकोचा प्रताप, नवऱ्याचे डोळेच फिरले; VIDEO VIRAL

झोपाळ्यावर सुरुवातीला एक मूल बसून झुलतं. ते पुढे जाऊन पुन्हा झाडाच्या दिशेला येतं, तेव्हा त्याच्या खांद्यावर झाडावरील दुसरं मूल उडी मारून बसतं. अशीच आणखी दोन मुलंसुद्धा बसतात.  त्यानंतर मात्र त्यांच्या वजनाने झोपाळा तुटतो आणि सर्व मुलं जमिनीवर धाडकन कोसळतात आणि मग इतर मुलं त्यांना हसू लागतात. जमिनीवर पडलेली मुलंही हसत उठतात यावरूनच त्यांना कोणती दुखापत झाली नाही हे स्पष्ट होतं.

हे वाचा - भुकेल्या मगरींना खायला द्यायला गेली आणि...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांना आवडत आहे. अनेकांना आपलं बालपण आठवलं आहे. जे लोक अशा पद्धतीने झाडावरील झोपाळ्यावर झुलले आहेत, त्यांच्या त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Funny video, Small child, Viral, Viral videos