जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: बापरे! मगरीसोबत ऐटीत फिरताना दिसली महिला; धाडस पाहून तुम्हीही चक्रावून जाल

VIDEO: बापरे! मगरीसोबत ऐटीत फिरताना दिसली महिला; धाडस पाहून तुम्हीही चक्रावून जाल

VIDEO: बापरे! मगरीसोबत ऐटीत फिरताना दिसली महिला; धाडस पाहून तुम्हीही चक्रावून जाल

या महिलेच्या हातामध्ये एक साखळी आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या साखळीनं महिलेनं मगर बांधली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 ऑगस्ट : काही लोक अत्यंत निर्भीड असतात. कितीही भयानक प्राणी समोर आला तरीही ते घाबरत नाहीत. सोशल मीडियावर (Social Media) असेच अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यात काही लोक भयानक प्राण्यांसोबत मैत्री करताना आणि त्यांच्यासोबत फिरताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एका वयस्कर महिलेचा व्हिडिओ (Instagram Video) शेअर केला गेला होता. यात ही महिला चक्क मगरीला (Alligator Video) फिरवताना दिसते. बाईक स्टंट करणं पडलं महागात; दुचाकीवरुन कोसळला तरुण अन्.., पाहा थरारक VIDEO Jay Brewer इन्स्टाग्रामवर भरपूर प्रसिद्ध आहे. ते प्राण्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ (Animal Videos) शेअर करत असतात. मात्र, यावेळी या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत अजूनही कोणीतरी दिसत आहे. Jay यांनी पाच दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवरुन हा रिल्स व्हिडिओ शेअर केला होता. यात एक वयस्कर महिला दिसते. या महिलेच्या हातामध्ये एक साखळी आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या साखळीनं महिलेनं मगर बांधली आहे.

जाहिरात

मांजरीला गाडी चालवताना कधी पाहिलं आहे का? ड्रायव्हर बनून घरभर फिरतेय, पाहा VIDEO Jay Brewer यांच्या या व्हिडिओमध्ये वृद्ध महिला साखळीनं बांधलेल्या मगरीसोबत फिरायला निघाल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओ पाहिल्यास महिलेमध्ये पूर्ण आत्मविश्वास दिसत आहे. सोबतच हेदेखील जाणवत आहे, की ती आपला हा प्रवास एन्जॉय करत आहे. महिलेच्या मागे Jay Brewer देखील डान्स करत चालले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखहू अधिकांनी पाहिला आहे. कमेंट्समध्ये सर्वच महिलेच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. तसंच हा व्हिडिओ शेअरही करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात