सध्याच्या काळात भावना, मतं व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया (Social Media) हे एक महत्त्वाचं साधन आहे. अनेक लोक आपले अनुभवदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. यात प्राण्यांवर प्रेम करणारी मंडळीदेखील मागे नाहीत. सोशल मीडियावर प्राण्यांचे लाखो फोटो किंवा व्हिडिओ शेअर (Share) केले जातात. यातून अनेकदा मनोरंजन हाच प्रमुख हेतू असतो. इंटरनेटवर सर्वांत जास्त पाहिल्या जाणाऱ्या कंटेंटपैकी (Content) एक असा हा कंटेंट असतो. अनेकदा या प्राण्यांचे व्हिडिओ किंवा फोटो इतके मजेदार आणि आनंद देणारे असतात, की ते पाहिल्यावर हसू आवरत नाही. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आलेला एका मांजराचा व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) होत आहे. अत्यंत मजेशीर असणारा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओतलं मांजर (Cat) आणि तिच्या करामतींना नेटिझन्सकडून विशेष दाद मिळत असून, त्यांचं चांगलंच मनोरंजन होत आहे. 6 लाखांहून अधिक नेटिझन्सच्या पसंतीस उतरलेला हा व्हिडिओ आणि त्यातल्या मांजराच्या करामती नेमक्या काय आहेत, हे जाणून घेऊ या. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
तुम्ही कधी मांजराला गाडी चालवताना पाहिलं आहे का? या प्रश्नावर तुम्ही नक्कीच ‘नाही’ असं उत्तर देणार; पण इन्स्टाग्रामवरच्या @batman_the_munchkin_cat या पेजवर एका मांजराचा अफलातून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओतल्या मांजराच्या करामती आणि त्याला गाडी चालवताना पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. तसंच व्हिडिओ पाहताना ही कार (Car) आहे की ट्रेन (Train) आहे याचा अंदाजही लावता येणार नाही. विशेष म्हणजे हा मनोरंजक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, आतापर्यंत 6 लाखांहून अधिक युझर्सनी पाहिला आहे. अनेक युझर्सनी हा व्हिडिओ शेअर केला असून, काहींनी यावर विविध प्रकारच्या कमेंट (Comment)केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून युझर्स हसून लोटपोट होत असून, त्यांना मांजर आणि त्याची सुंदर सफर खूपच आवडली असल्याचं टीव्ही नाइन हिंदीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हे ही वाचा- अजबच! चक्क कुत्रा चालवतोय सायकल; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक हा व्हिडिओ शेअर करताना ‘ही एक कार आहे. ही एक ट्रेन आहे. ही बॅटमॅन द मंचकीन कॅट आहे,’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हे मांजर चंचल आणि खोडकर असून, ते वीकेंडला (Weekend) ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसलं असल्याचं या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

)







