भोपाळ 04 जुलै: सोशल मीडियावर अनेकदा हैराण करणारे व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. समाजातील अनेक भागांमध्ये अजूनही महिलांना त्यांच्या मनाप्रमाणं जगण्याचा किंवा आवडी जोपासण्याचा हक्क दिला जात नाही. हा त्यांचा हक्क नसून गुन्हा असल्याचं अनेकांचं मत असतं. हे सगळं सांगण्याचं कारण असं की नुकताच समोर आलेला धक्कादायक व्हिडिओदेखील याचंच एक उदाहरण आहे. या व्हिडिओत काही युवक एका महिलेला अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. आईनंच 5 वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगात टाकला लोखंडी रॉड; धक्कादायक घटनेनं खळबळ हा व्हिडिओ संदीप सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन (Twitter Handle) शेअर केला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये (Caption) त्यांनी लिहिलं आहे, की ‘फोनवर बोलल्याची शिक्षा! हा व्हिडिओ कोणत्या तालिबानी परिसरातील नाही तर मध्य प्रदेशच्या धार येथील आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या भयंकर गुन्ह्यासाठी आरोपींना काहीही शिक्षा मिळालेली नाही. हे आरोपी केवळ पोलीस ठाण्यात उपस्थित राहून परत गेले आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांना सोडून दिलं आहे. इतक्या भयंकर कृत्याची इतकी लहान शिक्षा?’
फोन पर बात करने की सज़ा!
— متجر الحداد (@SINGH_SANDEEP_) July 4, 2021
ये तस्वीरें किसी तालिबानी इलाके की नहीं बल्कि मध्यप्रदेश के धार की हैं हैरानी इस बात की इन हैवानों को इस बर्बरता के लिए सिर्फ थाने आकर जाने की सजा मिली।पुलिस ने मामूली मारपीट की
धारा में मामला दर्ज किया और छोड़ दिया।
इस बर्बरता की सिर्फ़ इतनी सी सज़ा? pic.twitter.com/iSKdVTHhOj
लग्नमंडपात अचानक पोलिसांची एन्ट्री; नवरदेव-नवरीला विचारला एक सवाल आणि मोडलं लग्न व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की तीन युवक एका महिलेला अमानुष मारहाण करत आहेत. ते या महिलेला काठीसोबतच लाथेनंही मारत आहेत. अक्षरशः हातातील काठी तुटेपर्यंत त्यांनी या महिलेला मारहाण केली आहे. यासोबतच तिचे केस पकडून तिला ओढत नेलं आहे. या सर्व घटनेदरम्यान कोणीही या महिलेच्या मदतीसाठी समोर आलं नाही. आजूबाजूला इतरही अनेक लोक उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, ते या महिलेची मदत करण्याऐवजी केवळ हे सगळं पाहात बसले आहेत. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.