मराठी बातम्या /बातम्या /Viral /आईनंच 5 वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगात टाकला गरम लोखंडी रॉड; धक्कादायक घटनेनं खळबळ

आईनंच 5 वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगात टाकला गरम लोखंडी रॉड; धक्कादायक घटनेनं खळबळ

उल्हासनगरमध्ये 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

उल्हासनगरमध्ये 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

एका आईनं आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत अतिशय घृणास्पद कृत्य केलं आहे. आईनं लोखंडाचा गरम रॉड (Hot Iron Rod) आपल्या मुलीच्या गुप्तांगात (Private Part) टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्ली 04 जुलै: अनेकदा आपण असं ऐकता की आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी आई (Mother) स्वतःचा जीवही धोक्यात घालू शकते. बऱ्याचदा अशा घटना पाहायलाही मिळतात. मात्र, आता एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईनं आपल्या पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत अतिशय घृणास्पद कृत्य केलं आहे. आईनं लोखंडाचा गरम रॉड (Hot Iron Rod) आपल्या मुलीच्या गुप्तांगात (Private Part) टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरलं आहे.

पुण्यात 'आश्रम' वेब सीरीजची पुनरावृत्ती; अनैतिक संबंधातून व्यावसायिकाची हत्या

डेली पोस्टमध्ये आलेल्या वृत्तानुसार, नायजेरियाच्या अडामावा येथे ही भयंकर घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेचं नाव आयशा मोहम्मद आहे. तिचं वय 18 वर्ष असून ती या चिमुकलीची सावत्र आई आहे. यात या मुलीची चूक फक्त इतकीच होती, की तिनं बेडवर लघवी केली. आरोपी महिलेला आपल्या सावत्र मुलीबद्दल प्रचंड चिड आहे. या चिमुकलीच्या खऱ्या आईचा घटस्फोट झाला आहे. या चिमुकलीची कस्टडी सध्या वडिलांकडे आहे.

या घटनेनंतर पीडित चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की सावत्र आईनं अत्याचाराच्या सर्व सीमा पार केल्या. तिनं चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गरम लोखंडी रॉड घुसवण्याचा प्रयत्न केला आणि गुप्तांगाजवळ चटकेही दिले. यात चिमुकली गंभीररित्या जखमी झाली. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

तरुणानं अल्पवयीन प्रेयसीची केली हत्या, व्हिडिओ शेअर करत सांगतिलं धक्कादायक कारण

लहान मुलीच्या रडण्याच्या आवाजामुळे शेजाऱ्यांनी संशय आला. यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं या घटनेचा खुलासा झाला. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे. आरोपी महिलेविरोधात कठोर कारवाई कऱण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Crime news, PRIVATE part, Small girl, Viral