• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • नशेत धुंद असलेल्या पतीला बायकोनं धू-धू धुतलं; VIDEO मधील महिलेचा रुद्रावतार पाहून नेटकरी हैराण

नशेत धुंद असलेल्या पतीला बायकोनं धू-धू धुतलं; VIDEO मधील महिलेचा रुद्रावतार पाहून नेटकरी हैराण

एक महिला एका व्यक्तीची धुलाई करताना (Wife Beats Her Husband) दिसत आहे. कारण, तो दारुच्या नशेत धुंद आहे. एका आयपीएस ऑफिसरनं (IPS Officer) हा व्हिडिओ शेअर करत त्याला मजेशीर कॅप्शन (Caption) दिलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 03 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) दररोज निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ मजेशीर, काही भावुक करणारे तर काही हैराण करणारे असतात. सध्या एक असाच व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये एक महिला एका व्यक्तीची धुलाई करताना (Wife Beats Her Husband) दिसत आहे. कारण, तो दारुच्या नशेत धुंद आहे. एका आयपीएस ऑफिसरनं (IPS Officer) हा व्हिडिओ शेअर करत त्याला मजेशीर कॅप्शन (Caption) दिलं आहे. अरे ही नवरी आहे की...; लग्नाच्याच दिवशी नववधूचा अवतार पाहून नवरदेवही चक्रावला हा व्हिडिओ जुना आहे मात्र आयपीएस अधिकाऱ्यानं शेअर केल्यानंतर व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला आहे. अनेक लोकं असे असतात ज्यांना दारु प्यायल्यानंतर काहीही समजत नाही. नशेत ते इतके बुडालेले असतात की आपण काय करतोय आणि काय बोलतोय हेदेखील त्यांना समजत नसतं. याच कारणामुळे अनेकदा मोठे वादही होतात. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून या व्यक्तीसोबतही असंच काही झाल्याचं लक्षात येतं. याच कारणामुळे त्याला ही शिक्षा मिळाली असावी. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक महिला एका व्यक्तीला बांधून त्याला जबरदस्त मारहाण करत आहे. त्यानं काही बोलण्याचा प्रयत्न करताच महिला त्याला मारत आहे. Shocking Viral Video :साप नाकात घालून तोंडातून काढला बाहेर,अंगावर काटा उभा राहील ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत भारतीय पोलीस सर्व्हिसचे अधिकारी रुपिन शर्मा यांनी मजेशीर कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं, की दारू सोडवण्याचा 100 टक्के खात्रीशीर उपचार. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. तर, काही नेटकरी यावर निरनिराळ्या कमेंट करून मजा घेत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: