जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking Viral Video : साप नाकात घालून तोंडातून काढला बाहेर, अंगावर काटा उभा राहील

Shocking Viral Video : साप नाकात घालून तोंडातून काढला बाहेर, अंगावर काटा उभा राहील

Shocking Viral Video : साप नाकात घालून तोंडातून काढला बाहेर, अंगावर काटा उभा राहील

एका अभिनेत्याने हा VIDEO शेअर केला आहे. मात्र ज्यांना सापाची भीती वाटते, ते हा व्हिडीओ पाहू शकणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) याने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र कोणीही हा व्हिडीओ सहजासहजी पाहू शकत नाही. साप पाहिल्यानंतर सर्वांनाच भीती वाटते. मात्र जर कोणी व्यक्ती साप नाकात घालून तोंडातून बाहेर काढत असेल तर कसं वाटेल? या व्हिडीओमध्ये असंच काहीसं दाखविण्यात आलं आहे. ज्यात ही व्यक्ती साप नाकात घालून त्याला तोंडातून बाहेर काढत आहे. (Shocking Viral Video Snake put in the nose and taken out of the mouth) विद्युत जामवालने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सापाला अगदी सहजपणे ही व्यक्ती नाकात घातले आणि त्यानंतर तोंडातून बाहेर काढते. यादरम्यान सापाचा काही भाग हलताना पाहू शकता. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहिलं. विद्युतने व्हिडीओ शेअर करीत याला कॅप्शनही दिलं आहे. यावर त्याने आय लव्ह माय इंडिया असं लिहिलं आहे. हे ही वाचा- VIDEO : 2 मिनिटात सरड्याने 7 वेळा बदलले रंग; निसर्गाचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद

जाहिरात

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहीजणं खूप नाराज झाले. मात्र काहींनी हा व्हिडीओ पसंत केला आहे. काही लोकांना या व्हिडीओत प्राण्यांसोबत चुकीचा व्यवहार केल्याचं म्हटलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की, या व्हिडीओमध्ये प्राण्यांसोबत गैरव्यवहार केल्याचं तुम्हाला वाटत नाही का? साप त्या व्यक्तीच्या नाकात शिरू इच्छित होता? तर दुसऱ्या एका युजरने यामागील कारण विचारलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात