Home /News /viral /

VIDEO: 'कर्माचं फळ मिळालं'; लाथ मारणाऱ्या युवकाला झाडानंच दिलं जोरदार प्रत्युत्तर

VIDEO: 'कर्माचं फळ मिळालं'; लाथ मारणाऱ्या युवकाला झाडानंच दिलं जोरदार प्रत्युत्तर

या व्हिडिओमध्ये (Video) पाहायला मिळतं, की एक व्यक्ती जोरजोरात एका झाडाला लाथ मारत आहे. मात्र, काहीच वेळात त्याच्यासोबत असं काही घडतं की हे पाहून त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळाल्याचं लोक म्हणू लागले आहेत

    नवी दिल्ली 03 जुलै : आपण अनेकदा असं ऐकतो की तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही लोकांना दिलं. मराठीत बऱ्याचदा आपण पेरलं तेच उगवतं असंही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल. अनेकदा या गोष्टींचा प्रत्यय आपल्याला प्रत्यक्षातही येतो. सध्या सोशल मीडियावर व्हारयल झालेला एक व्हिडिओदेखील (Video Viral on Social Media) हीच गोष्ट सिद्ध करून दाखवतो. ही घटना नेमकी कधीची आणि केव्हाची आहे, याबाबतची फार माहिती मिळून शकलेली नाही. मात्र, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऐन लग्न मंडपात नवरदेवाच्या तोंडून निघालं असं काही की...; Funny Video आला समोर हा व्हिडिओ एका आयएफएस ऑफिसरनं (IFS Officer) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक व्यक्ती जोरजोरात एका झाडाला लाथ मारत आहे. मात्र, काहीच वेळात त्याच्यासोबत असं काही घडतं की हे पाहून त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळाल्याचं लोक म्हणू लागले आहेत. हा व्हिडिओ आयएफएस सुधा रमन यांनी शेअर केला आहे. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, की जसं तुम्ही करता, तसंच तुम्हाला परत मिळतं (All That You Do Comes Back to You). मग ते चांगलं असो किंवा वाईट. हा ओरिजनल व्हिडिओ Idiots Fighting Things नावाच्या ट्विटरवर हँडलवरुन (Twitter Handle) शेअर केला गेला आहे. कुत्र्याला बेदम मारहाण करून केली हत्या आणि मग..; तरुणाच्या अमानुष कृत्याचा VIDEO व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती जोरजोरात एका झाडावर लाथ मारत आहे. इतक्यात या झाडाचा अर्धा भाग तुटतो आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावर येऊन पडतो. या घटनेत संबंधीत व्यक्तीही जमिनीवर कोसळतो. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 1 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. लोक यावर कमेंट करुन या व्यक्तीची खिल्ली उडवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Social media, Viral news

    पुढील बातम्या