Home /News /viral /

बापरे! दंश करताना विंचू कसं सोडतो विष? पाहा हैराण करणारा VIDEO

बापरे! दंश करताना विंचू कसं सोडतो विष? पाहा हैराण करणारा VIDEO

सध्या सोशल मीडियावर एका काळ्या रंगाच्या विंचाचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यामध्ये हा विंचू आपलं विष कसं बाहेर सोडतो (Video of Scorpion Spilling Out Poison) हे अगदी स्पष्टपणे दिसतं.

    नवी दिल्ली 04 जुलै : पृथ्वीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जीव आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही विषारी (Toxic) असतात तर काही साधारण. मात्र, विषारी शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा चित्र उभा राहातं ते सापाचं (Snake). मात्र, आज आम्ही ज्या विषारी जीवाबद्दल बोलत आहोत तो विंचू (Scorpion) आहे. विंचू जितक्या वेगात दंश करतो तितक्याच जोरात त्याचं विष शरीरात पसरतं. मात्र, विंचू आपलं विष कशाप्रकारे बाहेर सोडतो, हे कधी पाहिलंय का? VIDEO : खरी मैत्री; भुकेल्या बकरीच्या मदतीला धावून आला कुत्रा, बाटलीनं पाजलं दूध सध्या सोशल मीडियावर एका काळ्या रंगाच्या विंचाचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यामध्ये हा विंचू आपलं विष कसं बाहेर सोडतो (Video of Scorpion Spilling Out Poison) हे अगदी स्पष्टपणे दिसतं. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काळ्या रंगाचा हा विंचू चावा घेण्यासाठी आधी पोजिशनमध्ये येतो. यानंतर अचानक तो एका झटक्यात विषाची धार सोडतो. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आईनंच 5 वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगात टाकला लोखंडी रॉड; धक्कादायक घटनेनं खळबळ हा व्हिडिओ ट्विटवर @astitvam नावाच्या यूजरनं 1 जुलै रोजी शेअर केला आहे. ही बातमी देऊपर्यंत व्हिडिओ ५ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला 500 लाइक्सही मिळाले आहेत. याआधी कधी तुम्ही विंचाला अशा प्रकारे विष सोडताना पाहिलं होतं का? हे कमेंट करून नक्की सांगा.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Scorpio, Video viral

    पुढील बातम्या