जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ...अन् बाळाला पाण्यात फेकून हसू लागली आई; VIRAL VIDEO पाहून नेटकरी म्हणाले 'राक्षस'

...अन् बाळाला पाण्यात फेकून हसू लागली आई; VIRAL VIDEO पाहून नेटकरी म्हणाले 'राक्षस'

...अन् बाळाला पाण्यात फेकून हसू लागली आई; VIRAL VIDEO पाहून नेटकरी म्हणाले 'राक्षस'

एक आई आपल्या छोट्या मुलाला पोहायला शिकवत (Swimming Lessons Video) आहे. हा व्हायरल व्हिडिओ बातमी देईपर्यंत 10 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 25 जुलै: जगातील प्रत्येक पालकांची (Parents) अशा इच्छा असते की आपला मुलगा किंवा मुलगी जगातील इतर मुलांपेक्षा अगदी वेगळा आणि हुशार असवा. यासाठी लहान वयातच त्यांना ट्रेनिंग देणंही सुरू होतं. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचं लक्ष त्यांच्याकडे आकर्षित व्हावं. आपण सर्वांनी लहान मुलांना डान्स करताना, गाणी गाताना आणि स्विमिंग शिकतानाही पाहिलं असेल. सोशल मीडियावर (Social Media) सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यात एक आई आपल्या मुलाला पोहायला शिकवत आहे. मात्र, ज्या पद्धतीनं ती आपल्या मुलाला पोहोयला शिकवत आहे, ते पाहून नेटकरीही संतापले आहेत. वरमाळा घालतानाच नवरीनं काढला पळ; नवरदेवाची भलतीच फजिती, मंडपातील Video Viral इन्स्टाग्रामवर Weird Vidz नावाचं एक अकाऊंट आहे. या अकाऊंटवरुन अनेकदा अजब किंवा विचित्र व्हिडिओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडिओ पाहून लोक हैराण होतात. असाच स्विमिंग पूलमधील एक व्हिडिओ या अकाऊंटवर शेअर केला गेला आहे. यात एक आई आपल्या छोट्या मुलाला पोहायला शिकवत (Swimming Lessons Video) आहे. हा व्हायरल व्हिडिओ बातमी देईपर्यंत 10 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. अनेकांनी आईची पोहायला शिकवण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलं आहे.

जाहिरात

अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट; लग्नात तरुणांनी घातला धुडगूस, VIDEO पाहून हादराल! हा व्हिडिओ पाहून लोकं आपली नाराजी व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर अनेकांचं असं म्हणणं आहे, की इतक्या लहान मुलाला घेऊन स्विमिंग पुलमध्ये जाण्यात काय अर्थ आहे? तर, काहींनी आईची ही पद्धत अत्यंत चुकीची आणि राक्षसी असल्याचं म्हटलं आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून काही लोकं बाळाच्या आईचीही बाजू घेत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांना पोहायला शिकवण्यासाठी हेच वय अगदी बरोबर आहे आणि ही पद्धतही बरोबर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात