मराठी बातम्या /बातम्या /Viral /दारूडं माकड! ऐटीत झाकण उघडत तोंडाला लावली बाटली; VIRAL VIDEO पाहून व्हाल अवाक

दारूडं माकड! ऐटीत झाकण उघडत तोंडाला लावली बाटली; VIRAL VIDEO पाहून व्हाल अवाक

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ (Viral Video of Monkey) पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. या व्हिडिओमध्ये एक माकड दारू पित (Monkey Drinks Liquor) असल्याचं दिसत आहे.

नवी दिल्ली 17 जुलै : अनेकदा आपण आपल्या आसपास असे लोक पाहिले असतील ज्यांचा एक दिवसही दारू प्यायल्याशिवाय जात नाही. अनेकांनी दारूचं व्यसनच (Alcohol addiction) लागलेलं असतं. मात्र, हीच सवय एखाद्या प्राण्याला लागली तर? सहाजिकच असं काही पाहायला मिळाल्यास आपण हैराण होऊ. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ (Viral Video of Monkey) पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. या व्हिडिओमध्ये एक माकड दारूची बाटली तोंडाला लावून दारू पित (Monkey Drinks Liquor) असल्याचं दिसत आहे.

फक्त 2 दिवसांसाठी सासूचा बॉयफ्रेंड व्हा 72 हजार रुपये घेऊन जा; सूनबाईने दिली ऑफर

हे माकड केवळ दारूच पित नाही तर अगदी स्टाईलमध्ये आपल्या तोंडाचा वापर करत बाटलीचं झाकणंही उघडतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहू शकता की हे माकड कशाप्रकारे दारूची बाटली तोंडाला लावून आरामात दारू पित आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या मंडलामधील एका दुकानातील आहे, जिथे दारूची विक्री होते.

अरेच्चा! नवरी, नवरदेवाच्या मध्ये तिसरंच कोण? VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की कोणीही या माकडाला दारू पिण्यापासून अडवत नाहीये किंवा तिथून पळवूनही लावत नाहीये. या माकडाला काहीतरी खाण्यासाठीही दिलं जातं मात्र त्यानंतर असं जाणवतं की त्याला दारू पिण्यातच अधिक रस आहे, इतर काही खाण्यात नाही. सोशल मीडियावर अनेकदा तुम्हाला अशा घटनांचे व्हिडिओ पाहायला मिळतात ज्या प्रत्यक्षात तुम्ही कधीही पाहिल्या नसतील.

First published:
top videos

    Tags: Beer, Liquor stock, Video viral