मराठी बातम्या /बातम्या /Viral /कारची दुचाकीला धडक; घटनेत जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू; भीषण अपघाताचा VIDEO आला समोर

कारची दुचाकीला धडक; घटनेत जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू; भीषण अपघाताचा VIDEO आला समोर

या घटनेत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचला. मात्र, त्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कार चालकाच्या बेजबाबदरपणामुळे या तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे

अहमदाबाद 17 जुलै : एका कारनं भरधाव वेगात असतानाच दुसऱ्या कारला (Car Accident) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की धडक बसलेली कार समोर जाऊन एका दुचाकीला धडकली. या दुचाकीवर एक व्यक्ती आणि त्याची मुलगी प्रवास करत होते. या घटनेत कारला इतकी जोरात धडक बसली होती की कारनं दुचाकीला धडक दिलीच. मात्र, काही अंतरापर्यंत ही गाडीही कारसोबतच गेली. या भयंकर घटनेचा व्हिडिओ (Video of Road Accident) सध्या समोर आला आहे. ही घटना गुजरातच्या (Gujarat) नवसारीमधील आहे.

'यांना WWF मध्ये पाठवा'; चिमुकल्यांनी एकमेकांना अक्षरशः धु धु धुतलं, पाहा VIDEO

या घटनेत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचला. मात्र, त्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कार चालकाच्या बेजबाबदरपणामुळे या तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना दहा दिवसांपूर्वी घडली आहे. मात्र, इतके दिवस तरुणीवर उपचार सुरू होते, अशात आज उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नको ती डेअरिंग भलतीच महागात! धावत येत हत्तीने बाईकस्वारांना पाडलं आणि....

पोलीस तपासात घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण घटना स्पष्ट दिसत आहे. एका भरधाव वेगात असणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं ही कार रस्त्यावरच समोर असलेल्या दुसऱ्या कारला जोरात धडकली. यानंतर समोरची कार वेगात असल्यानं या धडकेमुळे दुसऱ्या कार चालकाचंही गाडीवरील नियंत्रण सुटलं. या कारनं पुढे दुचाकीला धडक दिली.

First published:
top videos

    Tags: Gujrat, Major accident, Road accident, Shocking video viral