व्हिडीओत पाहू शकता, बाईकवर असलेले दोन तरुण हत्तींच्या दिशेनं आले. त्यांना आपल्या दिशेनं येताना पाहून एक भलामोठा हत्ती त्यांच्या दिशेने वेगाने धावत गेला. तरुणांनी भीतीने आपली बाईक पळवण्याचा प्रयत्न केला पण तेव्हाच हत्तीने सोंडेने त्यांच्या बाईकला धक्का दिला आणि ते तरुण बाईकसह जमिनीवर कोसळले. तरुण कसेबसे स्वतःला सावरत उभे राहिले आणि त्यांनी तिथून लगेच पळ काढला. सुदैवाने हत्तीच्या तावडीतून तरुण बचावले. हत्तीनेही स्वतःच्या रागावर आवर घातला आणि तो तिथून रस्त्याच्या दुसऱ्या दिशेला जाऊन उभा राहिला. हे वाचा - माकडाच्या हाती लागला चाकू; मदाऱ्यावरच खेळ उलटला आणि... Shocking video या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा जंगलाचा राखीव भाग आहे. अशा भागात प्राणी रस्ता ओलांडत असतात. त्यावेळी गाड्यांनी थांबण्याचा नियम असतो. प्राण्यांना जाण्याचा मार्ग द्यावा प्राणी रस्त्याच्या बाजूला झाल्यानंतरच गाड्या पुढे जातात. हे हत्तीसुद्धा रस्ताच्या एका कडेला असलेल्या पाणवठ्यावरून आले होते. रस्ता ओलांडून ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या जंगलात जात होते. तेव्हा त्यांना पाहून एक गाडी दूर उभी राहिली. पण या तरुणांनी मात्र जोशात आपली बाईक चालवली. त्याचे परिणाम काय झाले ते तुम्हाला दिसतच आहेत. या तरुणांचं नशीब बलवत्तर म्हणून हत्तींना त्यांना आपल्या पायाखाली चिरडलं नाही. हे वाचा - घराच्या बाहेर खेळणाऱ्या लहानग्याच्या मागे भयावह किंग कोब्रा; VIDEO मध्ये पाहा indianwildlifeofficial इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या घटनेवेळी तिथं असलेल्या फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात ही सर्व घटना कैद केली. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elephant, Shocking video viral, Viral, Viral videos, Wild animal