कल्याण, 31 जुलै : महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे स्थानकावर एक भयंकर अपघात घडला. एका प्रवाशाच्या चुकीमुळे त्याचा जीव धोक्यात आला होता. मात्र रेल्वे संरक्षण गार्ड्सच्या (RPF) प्रसंगवधानामुळे या रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचले. कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी ट्रेनमधून उतरण्याच्या घाईत एक प्रवासी चालत्या गाडीतून खाली पडला. खाली पडताच हा प्रवासी ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये घसरत गेला, मात्र तेवढ्यात स्थानकावर उभा असलेल्या RPF जवानाने प्रवाशाला मागे खेचले. यामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले.
स्टेशन ड्युटीवर तैनात आरपीएफ जवान साहू आणि महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) सोमनाथ महाजन यांनी या प्रवाशाला पाहिले आणि या प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी धावले. ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा जीव वाचविण्यात दोन्ही सैनिकांना यश आले.
वाचा-CCTV VIDEO: हम तो उड गये! हवेत उडून महिलेवर आदळला रिक्षा चालक
#WATCH On duty Railway Protection Force personnel K Sahu and Maharashtra Security Force personnel Somnath Mahajan at Kalyan railway station saved the life of a 52-year old passenger, who slipped between the platform and track as he de-boarded from a moving a train yesterday. pic.twitter.com/rmd0OuMzEy
— ANI (@ANI) July 29, 2020
वाचा-पाण्यात दोन सापांमध्ये खतरनाक राडा, हवेतून केला वार; थरारक VIDEO VIRAL
ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना रेल्वेने म्हटले आहे की, “कृपया चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करू नका. हे प्राणघातक ठरू शकते". वृत्तसंस्था एएनआयच्या मते, एक 52 वर्षीय व्यक्ती मंगळवारी कल्याण रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होती.
मध्य रेल के कल्याण स्टेशन पर महाराष्ट्र सिक्योरिटी फोर्स एवं रेलवे सुरक्षा बल के जवानों ने सतर्कता और सूझबूझ से चलती हुई गाड़ी से उतरने का प्रयास करते हुए यात्री की जान बचाई।
कृपया चलती ट्रेन से उतरने चढ़ने का प्रयास नहीं करें यह जानलेवा हो सकता है। pic.twitter.com/ZaKpJVDMoI
— Ministry of Railways (@RailMinIndia) July 30, 2020
वाचा-मध्यरात्री रुग्णालयातून येत होता किंचाळण्याचा आवाज, VIDEO VIRAL झाला आणि...
असे अनेक अपघात रेल्वे ट्रॅकवर पाहायला मिळतात, अनेकांना या अपघातात जीवही गमवावा लागतो. मात्र यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवधानामुळे या रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचले.