• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: ..अन् मंडपातच गाढ झोपला नवरदेव; नवरीची प्रतिक्रिया पाहून नाही आवरणार हसू

VIDEO: ..अन् मंडपातच गाढ झोपला नवरदेव; नवरीची प्रतिक्रिया पाहून नाही आवरणार हसू

या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव स्टेजवर बसले असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, सर्वात मजेशीर बाब ही आहे, की नवरदेव स्वतःच्याच लग्नात स्टेजवर झोपला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 15 जुलै : भारतात लग्नसमारंभ (Marriage Function) हे एखाद्या अत्यंत पवित्रा सणाप्रमाणेच मानले जातात. बहुतेक घरांमध्ये लग्नाच्या निमित्तानं अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. यासाठी घरात अनेक नातेवाईक, मित्र-मैत्रीणी आणि पाहुणेही येतात. यादरम्यान अनेकदा लग्नाच्या घाईत नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) भरपूर थकतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका लग्नातील आगळावेगळा व्हिडिओ व्हायरल (Wedding Funny Video) होत आहे. या मजेशीर व्हिडिओमध्ये नवरदेवानं स्टेजवरच आपली झोप घेतली आहे. भयंकर! पतीकडून हात सुटला अन् 9 व्या मजल्याहून कोसळली महिला; घटनेचा LIVE VIDEO सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर लग्नातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीसही उतरतात. असाच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram Video) निरंजन महापात्रा नावाच्या एका व्यक्तीनं शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव स्टेजवर बसले असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, सर्वात मजेशीर बाब ही आहे, की नवरदेव स्वतःच्याच लग्नात स्टेजवर झोपला आहे.
  पर्यटकांची भाईगिरी; किरकोळ वादातून रस्त्यावरच तलवारबाजी, पाहा धक्कादायक VIDEO नवरी आणि नवरदेवाच्या आसपास असणारे लोक त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक त्याला आवाज देत आहेत तर काही त्याला हात लावून जागं करण्याचा प्रयत्न करत आहेत. नवरीबाईदेखील मध्ये मध्ये हळूच नवरदेवाकडे पाहत आहे. मात्र, नवरदेव इतका गाढ झोपेत आहे की त्याला या सगळ्याची काहीच कल्पना नाही. या व्हिडिओवर लोकही मजेशीर कमेंट करत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 79 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यूजर्स यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. काहींनी कमेंट करत म्हटलं, की आज नवरदेवाला रुममध्ये एन्ट्री मिळणार नाही तर काहींनी म्हटलं, की यानं आपल्याच लग्नात इतकी दारू की प्यायली.
  Published by:Kiran Pharate
  First published: