मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पर्यटकांची भाईगिरी; किरकोळ वादातून रस्त्यावरच तलवारबाजी, धक्कादायक VIDEO आला समोर

पर्यटकांची भाईगिरी; किरकोळ वादातून रस्त्यावरच तलवारबाजी, धक्कादायक VIDEO आला समोर

पंजाबचे काही पर्यटक मनालीमध्ये गुंडागिरी (Hooliganism of Punjab tourists ) करताना दिसले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

पंजाबचे काही पर्यटक मनालीमध्ये गुंडागिरी (Hooliganism of Punjab tourists ) करताना दिसले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

पंजाबचे काही पर्यटक मनालीमध्ये गुंडागिरी (Hooliganism of Punjab tourists ) करताना दिसले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

    शिमला 15 जुलै : कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाल्यानं बऱ्याच ठिकाणी नियम (Corona Protocol) शिथिल करण्यात आले आहेत. अशात हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र आहे. या गर्दीचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशात आता पंजाबचे काही पर्यटक मनालीमध्ये गुंडागिरी (Hooliganism of Punjab tourists ) करताना दिसले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये हे पर्यटक हवेत तलवार (Sword) फिरवताना दिसत आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अरे बापरे! सिंहासमोर स्वतःच गेला; पुढे जे घडलं ते VIDEO पाहून विश्वास बसणार नाही मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. पर्यटकांनी भररस्त्यातच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. ही घटना मनाली पोलीस स्टेशनपासून काहीच अंतरावर घडली. पंजाबच्या पटियाला इथून आलेली एक गाडी ट्राफिकमध्येच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. याच दरम्यान समोरुनही एक गाडी आली. यानंतर दोन्ही गाडीमधील लोकांमध्ये वाद सुरू झाला. यानंतर पंजाबहून आलेल्या पर्यटकांनी गाडीतून तलवारी काढत हवेत फिरवल्या. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की पर्यटक हातामध्ये तलवार घेऊन रस्त्यात उभा आहेत. यादरम्यान ते आपल्या इतर जोडीदारांना बोलवण्यासाठीही फोन करत आहेत. कुल्लूचे एसपी गुरुदेव शर्मा यांनी सांगितलं, की मनालीमध्ये जनतेवर तलवारीनं हल्ला केल्याप्रकरणी चार पर्यटकांना अटक करण्यात आली आहे. हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा पर्य़टकांना त्यांची कार मागे घेण्यास सांगण्यात आलं. कारण, त्यांच्या गाडीमुळे ट्राफिक जाम झालं होतं. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला आहे. लव्ह, सेक्स आणि..! विवाहित प्रियकरानं गर्लफ्रेंडचा घेतला सूड; आयुष्य उद्धवस्त कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं हिमाचल प्रदेशात नियम शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक याठिकाणी पोहोचत आहेत. याचदरम्यान आता पर्यटकांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की आरोपींची चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Himachal pradesh, Shocking video viral

    पुढील बातम्या