नवी दिल्ली 15 जुलै : एका पॉश सोसायटीच्या नवव्या मजल्यावरून एक महिला संशयास्पद अवस्थेत खाली कोसळली (Woman Falls From 9th Floor) . बालकनीमध्ये उभा असलेल्या व्यक्तीनं या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि खाली कोसळत असलेल्या या महिलेचा हात पकडला. मात्र, हात निसटला आणि हादरवणारी घटना घडली. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओदेखील (Live Video) समोर आला आहे. यात पाहायला मिळतं की ही महिला बालकनीच्या जवळ लटकलेली आहे आणि एक व्यक्ती तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, डोळ्याच्या पापण्या झाकण्याआधीच या महिलेचा हात सुटतो. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमधील (Ghaziabad) क्रॉसिंग रिपब्लिक परिसरातील एका पॉश आणि प्रसिद्ध सोसायटीमधील आहे. VIDEO: गुन्हेगाराच्या वाढदिवसाचे मुंबई पोलिसांकडून सेलिब्रेशन ही घटना बुधवारी सायंकाळी घडल्याचं समोर आलं आहे,. काही लोकांनी नवव्या मजल्यावर एक महिला आणि पुरुषाला भांडताना पाहिलं. इतक्यात ही महिला अचानक खाली कोसळते. असं म्हटलं जात आहे, की भांडणादरम्यान महिलेनं बालकनीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेच्या पतीनं लगेचच तिचा हात पकडला. परंतु काहीच सेकंदात तिचा हात सुटला आणि ती खाली कोसळली. याप्रकरणी कोणतीही तक्रार पोलिसांत (Police Case) देण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
9 व्या मजल्याहून कोसळली महिला; घटनेचा LIVE VIDEO pic.twitter.com/Nr8YidJXem
— News18Lokmat (@News18lokmat) July 15, 2021
विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यात प्राध्यापकाकडूनच विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हत्या (Murder) आणि आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न या दोन्ही बाजूंनी पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला नोएडाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही महिला शुद्धीवर येण्याची वाट पाहिली जात आहे. ती शुद्धीवर येताच तिला याबाबत विचारलं जाणार आहे. यानंतरच चित्र स्पष्ट होईल. महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे.