नवी दिल्ली 22 ऑगस्ट : एक वडील (Father) आपल्या मुलांसाठी आयुष्यात किती त्याग करतात, हे केवळ एक वडीलच सांगू शकतात. अनेकजण असंही म्हणतात, की मुलांचे वडील बनणं हे जगातील सर्वात सोपं काम आहे. मात्र, मुलांची जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडणं हे खूप अवघड आणि मोठं काम आहे. सोशल मीडियावर (Social Media) याच गोष्टीचा प्रयत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलांना सायकलवर (Video of Father Carrying 9 Children’s on Cycle) घेऊन जात असल्याचं दिसतं. VIDEO: एवढ्याशा चिमुकलीनं आईला चपलेनं मारलं; महिलेनं मुलीला दिली अशी शिक्षा आता हे वाचून तुम्हाला असं वाटलं असेल की सायकलवर मुलांना घेऊन जाण्यात विशेष काय आहे. मात्र, हा व्यक्ती सायकलवर एक दोन नव्हे तर नऊ मुलांना घेऊन जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक व्यक्ती सायकल घेऊन कुठेतरी निघाला आहे. या व्यक्तीनं आपल्या सायकलवर मुलांना बसवलं आहे. त्यानं सायकलच्या कॅरिअरवर तीन मुलांना बसवलं आहे.
Who said fatherhood is an easy job🤓 pic.twitter.com/NDaJ1vkoLK
— Susanta Nanda (@susantananda3) January 20, 2021
‘तिचं माझ्यावर प्रेम’; मगरीनं हल्ला करूनही विश्वास करत राहिली हँडलर, पण… दोन मुलांना आपल्या खांद्यावर बसवलं आहे. याशिवाय तीन मुलांना सायकलच्या हँडलवर बसवलं आहे तर एकाला पिशवीमध्ये ठेवलं आहे. तर, आणखी एकाला या व्यक्तीनं सायकलच्या सीटवर उभा केलं आहे आणि या सर्वांना घेऊन तो अगदी वेगात सायकल चालवत आहे. 15 सेकंदाचा हा व्हिडिओ सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, की कोण म्हणतं, पितृत्व सोपं काम असतं? हा व्हिडिओ आतापर्यंत 41 हजार 900 हून अधिकांनी पाहिला आहे. तर, 2800 यूजर्सनं हा व्हिडिओ लाईक केला आहे. यासोबतच हा व्हिडिओ 422 वेळा रिट्विटही केला गेला आहे.

)







