मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: बापरे! एवढ्याशा चिमुकलीनं आईला चपलेनं मारलं; महिलेनं मुलीला दिली अशी शिक्षा

VIDEO: बापरे! एवढ्याशा चिमुकलीनं आईला चपलेनं मारलं; महिलेनं मुलीला दिली अशी शिक्षा

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला आपल्या रुममध्ये आरामात झोपली आहे. इतक्यात तिचा पती आणि मुलगी रूममध्ये येतात. या लहान मुलीच्या हातात चप्पल असते आणि ती आईजवळ जाऊन आईला मारू लागते

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 21 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) सतत लहान मुलांचे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Kids) होत असतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांचीही मोठी पसंती मिळते. या व्हिडिओमधील लहान मुलांचे मजेशीर कारनामे आणि त्यांचे हावभाव कोणाचंही मन जिंकून घेतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ (Funny Video) पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

आपल्या सर्वांना माहिती आहे, की लहान मुलं अत्यंत निष्पाप आणि खरी असतात. याचा फायदा घरातील सर्वच सदस्य घेतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एक वडिलांनी आपल्या बाळाच्या भोळेपणाचा फायदा घेत बाळाकडून आपल्या पत्नीला चप्पल मारून घेतली. यानंतर या छोट्या मुलीसोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

बापरे! हे काय आहे? बाळाचा VIDEO पाहून आईला फुटला घाम

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला आपल्या रुममध्ये आरामात झोपली आहे. इतक्यात तिचा पती आणि मुलगी रूममध्ये येतात. या लहान मुलीच्या हातात चप्पल असते आणि ती आईजवळ जाऊन आईला हळूहळू मारू लागते. हे पाहून मुलीचे वडील याचा फायदा घेतात आणि गेट बंद करून रुममधून बाहेर जातात. यामुळे, ही चिमुकली आतमध्येच अडकते आणि तिची आई तिला शिक्षा देते.

Oh No! स्टंट करता करता धाडकन तोंडावर आपटला अन्...; VIDEO पाहून पोट धरून हसाल

या मुलीचा निरागसपणा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की खूप मोठ्या अन्याय झाला या मुलीसोबत. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की आईला हे समजायला हवं, की इतकी लहान मुलगी एवढं मोठं प्लॅनिंग करू शकत नाही. यामागं दुसरं कोणाचा तरी हात आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर Funny Moment नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

First published:

Tags: Funny video, Video viral