मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: अंड्यामध्ये Fanta मिसळून बनवलं ऑमलेट; सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ही डिश नेमकी काय?

VIDEO: अंड्यामध्ये Fanta मिसळून बनवलं ऑमलेट; सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ही डिश नेमकी काय?

हा पदार्थ फंटा हे कोल्ड्रींक आणि अंड्याचं मिश्रण करून बनवला जातो. सध्या फंटा ऑमलेट (Fanta Omelette) हा पदार्थ  ट्विटरवर चांगलाच चर्चेत आहे

हा पदार्थ फंटा हे कोल्ड्रींक आणि अंड्याचं मिश्रण करून बनवला जातो. सध्या फंटा ऑमलेट (Fanta Omelette) हा पदार्थ ट्विटरवर चांगलाच चर्चेत आहे

हा पदार्थ फंटा हे कोल्ड्रींक आणि अंड्याचं मिश्रण करून बनवला जातो. सध्या फंटा ऑमलेट (Fanta Omelette) हा पदार्थ ट्विटरवर चांगलाच चर्चेत आहे

नवी दिल्ली 08 ऑगस्ट : तुम्ही हे वाक्य अनेकदा ऐकलं असेल की ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.’ असं यामुळे म्हटलं जातं, कारण अंड्यामध्ये (Egg) अनेक पौष्टिक तत्व असतात. अंडे खाल्ल्यानं आरोग्य चांगलं राहातं. अंड्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनतात. यात हाफ फ्राय, ऑमलेट, उकडलेले अंडे आणि अंडा करी असे पदार्थ सामील आहेत. मात्र, याशिवाय अंड्यापासून बनलेला काही विशेष पदार्थ (Special Dish) तुम्हाला खायला मिळाला तर? तोही असा पदार्थ ज्याबद्दल तुम्ही कधी ऐकलंही नसेल. असा पदार्थ खाण्यासाठी कदाचित तुम्हीही उत्साही व्हाल. असाच एक पदार्थ समोर आला असून फंटा ऑमलेट (Fanta Omelette) असं त्याचं नाव आहे.

VIDEO : आणखी एका महिलेचा प्रताप; कार चालकाला 9 वेळा चापट मारत बॅटनं धुतलं

हा पदार्थ फंटा हे कोल्ड्रींक आणि अंड्याचं मिश्रण करून बनवला जातो. सध्या हा पदार्थ ट्विटरवर चांगलाच चर्चेत आहे. मात्र, हा पदार्थ नेमका मिळतो कुठे? याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ईशा नावाच्या एका ट्विटर यूजरनं ही डिश बनवतानाचा संपूर्ण व्हिडिओ (Viral Video) आपल्या अकाऊंटवरुन (Twitter Account) शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या ट्विटरवर चांगलाच चर्चेत आहे. अशात आता हा पदार्थ नेमका मिळतो कुठे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मैदान सोडून अचानक प्रेक्षकांकडे धावत आला बैल; VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं

ईशानं व्हिडिओ अपलोड करत माहिती दिली आहे, की हा पदार्थ गुजरातच्या (Gujarat) सूरतमधील (Surat) एका दुकानात मिळतो. या दुकानाचं नाव इंडिया ईट मामा असं असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती संपूर्ण डिश बनवण्याची प्रक्रिया सांगत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याला ‘मॉम, कम पिक मी. दे आर फ्राइंग फंटा विद एग.’ असं कॅप्शन दिलं आहे. हा अडीच मिनिटांचा व्हिडिओ पाहून या आगळ्यावेगळ्या ऑमलेटची चव नेमकी कशी असेल, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. सोबतच 2000 हून अधिकांनी लाईकही केला आहे.

First published:
top videos

    Tags: Food, Live video viral, Video Viral On Social Media