मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आणखी एका महिलेची कार चालकाला मारहाण; 9 वेळा चापट मारत बॅटनं धुतलं, संतापजनक घटनेचा VIDEO

आणखी एका महिलेची कार चालकाला मारहाण; 9 वेळा चापट मारत बॅटनं धुतलं, संतापजनक घटनेचा VIDEO

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये महिला कार चालकाला जबर मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 08 ऑगस्ट : मागील 30 जुलैला भररस्त्यात कॅब चालकाला 20 हून अधिक कानशिलात लगावणाऱ्या तरुणीचा खरा चेहरा समोर येताच सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. लोक याप्रकरणी कॅब ड्रायव्हरच्या बाजूनं कॅम्पेन चालवत आहेत. मात्र, आता लखनऊनंतर पानिपत येथूनही एक असंच प्रकरण समोर आलं आहे. यात एक महिला एका कार चालकाला मारहाण (Girl Beats Car Driver in Panipat) करताना दिसत आहे.

VIDEO: कपड्यावरुन लग्नातच भिडले दोन पक्ष; धाडकन नवरीच्या अंगावर कोसळले अन्...

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये महिला कार चालकाला जबर मारहाण करत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्कूटीवरुन जाणाऱ्या महिलेनं दोन तरुणांना मारहाण केली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक स्कूटीवरील महिला कार चालकाला मारहाण करताना दिसत आहे. महिलेनं कॅब ड्रायव्हरला (Cab Driver) एकापाठोपाठ 9 वेळा कानशिलात लगावली. इतकं करूनही जेव्हा तिचं मन भरलं नाही तेव्हा तिनं कार चालकाला क्रिकेटच्या बॅटनं मारायला सुरुवात केली. इतकं करूनही महिला शांत झाली नाही. यानंतर तिनं आपल्या कुटुंबीयांना तिथे बोलावलं आणि पुन्हा कार चालकाला मारण्यास सांगितलं.

67 वर्षीय वृद्धाचा 19 वर्षीय तरुणीसोबत प्रेमविवाह; गावकऱ्यांचा खळबळजनक आरोप

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या महिलेविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की इतक्या वेळा एका मुलानं मुलीला मारलं असतं, तर लोकांनी काय केलं असतं? दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की आपल्या भारतीय समाजातील वास्तव, त्यांना वाटतं की मुली नेहमीच बरोबर असतात. लखनऊनंतर आणि पानिपतमधील हा व्हिडिओ याच गोष्टीचा पुरावा आहे. ही घटना शुक्रवारी पानिपतच्या शेरा गावातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडित युवकांची मेडिकल टेस्ट केली आहे. चौकशीनंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Taxi Driver