Home /News /viral /

मैदान सोडून अचानक प्रेक्षकांकडे धावत आला बैल; VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं

मैदान सोडून अचानक प्रेक्षकांकडे धावत आला बैल; VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं

बैलांच्या शर्यतीदरम्यान एक बैल (Bull) प्रेक्षकांनी भरलेल्या स्टँडकडे धावला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे.

    नवी दिल्ली 08 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) दररोज निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ हसवणारे तर काही रडवणारे असतात, मात्र या पलीकडे जाऊन काही व्हिडिओ असेही असतात जे पाहूनच अंगावर काटा येतो. विचार करा की कधी तुम्ही बैलांचा (Bull Video) खेळ पाहण्यासाठी गेला आहात आणि अचानक बैल तुमच्यावर धावून आलाय. सहाजिकच कोणाचीही घाबरगुंडी उडेल. अशीच एक घटना अमेरिकेच्या (America) इडाहो येथे घडली. याठिकाणी बैलांच्या शर्यतीदरम्यान एक बैल प्रेक्षकांनी भरलेल्या स्टँडकडे धावला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 67 वर्षीय वृद्धाचा 19 वर्षीय तरुणीसोबत प्रेमविवाह; गावकऱ्यांचा खळबळजनक आरोप व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की स्पर्धेदरम्यान एक बैल प्रेक्षकांकडे धाव घेतो. यानंतर इथे उपस्थित असलेले लोक घाबरले. ही घटना इडाहो-यूटा राज्याच्या सीमेपासून 48 किमी उत्तरेकजे प्रेस्टन येथे एका रायडिंग स्पर्धेदरम्यान घडली. यादरम्यान एका बैलानं स्वतःवर बसलेल्या व्यक्तीला खाली पाडलं आणि प्रेक्षकांनी भरलेल्या स्टॅण्डकडे धाव घेतली. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. काही वेळातच या बैलाला आटोक्यात आणण्यात आलं. अचानक विमानात झाली भल्यामोठ्या सापाची एन्ट्री अन्..; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की बैल केबलच्या वरून उडी घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, केबल तुटल्यानं त्याचा तोल गेला. व्हिडिओमध्ये प्रेक्षक ओरडत असल्याचं ऐकू येतं. कारण, हा बैल गर्दीकडे वेगाने धाव घेतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यूट्यूबवर हा व्हिडिओ viral hog नावाच्या चॅनेलवरून शेअर केला गेला आहे. लोक या व्हिडिओवर विविध कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bull attack, Shocking video viral

    पुढील बातम्या