Home /News /viral /

अनेकांचा जीव घेणारी दरड कोसळते तेव्हा नेमकं काय होतं? Live Video पाहून हादराल!

अनेकांचा जीव घेणारी दरड कोसळते तेव्हा नेमकं काय होतं? Live Video पाहून हादराल!

तळीये गावावर दरड कोसळल्यामुळे 38 तर पोलादपूर तालुक्यात दरड कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे.

    गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटनाही समोर येत आहे. त्यात गेल्या काही दिवसात कोकणासह अनेक भागात दरड (Landslide) कोसळल्याच्या घटना समोर येत आहे. आतापर्यंत अनेक घरे या दरडीखाली गाडली गेली आहेत. तर यामध्ये अनेकांना दुर्देवी अंत झाला आहे. वारंवार याबाबतच्या बातम्या समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक दरड कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पिथौरागड येथील आहे. या भागातील दरड कोसळतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमधून हे दृश्य शूट केलं आहे. पाहता पाहता डोंगरावरील मोठा भाग रस्त्यावर कोसळला. हे ही वाचा-VIDEO:असा धोका पत्करू नका! पुराच्या पाण्यात वाहून जात असतानाही दुचाकी सोडेना महाडमध्ये मुसळधार पावसात मोठी दुर्घटना (big tragedy in mahad) घडली आहे. तळीये गावावर दरड कोसळली आहे. तब्बल 35 घरांवर ही दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू (38 people died due to landslide) झाला आहे. अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे बचावपथक दाखल झाले असून बचाव आणि शोधमोहिम मोठ्या वेगाने सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. पोलादपूर तालुक्यात दरड कोसळून चौघांचा मृत्यू तर तिकडे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर सुतार वाडी येथे दरड कोसळून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजून 5 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तर 4 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या गावांना जोडणारे पितळवाडी- उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे मदत यंत्रणा पोहोचू शकत नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mahad, Pune landslide, Social media viral

    पुढील बातम्या