मुंबई 23 जुलै: साध्या-सोप्या प्रश्नांची चुकीची उत्तरं देण्याच्या आव्हानाचा म्हणजेच ‘राँग आन्सर्स चॅलेंज’चा (Wrong Answers Challenge) भारतीय क्रिकेटपटूंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. ‘तुमचं नाव काय’ अशासारख्या अगदी सोप्या प्रश्नांची उत्तरंही या चॅलेंजमध्ये चुकीची द्यायची असतात. भारतीय क्रिकेटपटू सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांचा हा व्हिडिओ शूट करण्यात आला असून, बीसीसीआयने (BCCI) त्याची क्लिप शेअर केली आहे. देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आधी खेळाडूंनी या मजेशीर चॅलेंजमध्ये भाग घेतल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. रैना जडेजामध्ये ब्राम्हण-रजपूत वाद; जातियवादामुळे दोन्ही क्रिकेटपटू ट्रोल थ्री इडियट्स सिनेमातले तीन अभिनेते कोण, मेस्सी (Messi) आणि रोनाल्डो (Ronaldo) हे खेळाडू कोणता खेळ खेळतात, रोहित शर्माने (Rohit Sharma) वन डे मॅचेसमध्ये किती द्विशतकं केली आहेत, अशा अनेक सोप्या प्रश्नांची मजेशीर उत्तरं या खेळाडूंनी दिल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
𝗪𝗔𝗥𝗡𝗜𝗡𝗚 ⚠️
— BCCI (@BCCI) July 22, 2021
ᴀɴꜱᴡᴇʀꜱ ᴛᴏ ᴀʟʟ Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ ɪɴ ᴛʜɪꜱ ᴠɪᴅᴇᴏ ᴀʀᴇ ᴡʀᴏɴɢ 😀
We played "WRONG ANSWERS" only with #TeamIndia & the results were hilarious 😎 - by @ameyatilak & @28anand
Full video 🎥 👇 #SLvINDhttps://t.co/WSskGucOpB pic.twitter.com/zFbFDXEcDw
तुमचं नाव काय, या प्रश्नाला पडिक्कलने (Padikkal) ‘रॉजर फेडरर’ असं उत्तर दिलं, तर त्याच प्रश्नाचं उत्तर देताना वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarty) स्वतः रजनीकांत असल्याचं सांगितलं. भारतीय खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये दिसत होते. पंड्या बंधू (Pandya Brothers) स्विमिंग पूलमध्ये आनंद लुटत होते, तर बाकीचे खेळाडू स्विमिंग पूलच्या आजूबाजूच्या परिसरात फिरून मजा करत होते, असं व्हिडिओत दिसत आहे. IND vs SL : टॉस जिंकताच शिखर धवनला पहिल्यांदा मिळाली ‘ती’ संधी, VIDEO VIRAL 22 जुलै रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास बीसीसीआयने या व्हिडिओची छोटी क्विप ट्विटरवर प्रसिद्ध केली. 24 तास व्हायच्या आत या व्हिडिओला 35.7 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. 3700 जणांनी हा व्हिडिओ लाइक केला असून, 309 जणांनी तो रिट्विट केला आहे. या व्हिडिओवर 67 कमेंट्स आल्या आहेत. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली श्रीलंकेत (Srilanka) गेलेली भारतीय क्रिकेट टीम (Team India) सध्या सुरू असलेल्या वन डे क्रिकेट मालिकेत (ODI Series) चांगली कामगिरी करत आहे. तीन मॅचेसच्या या मालिकेताल्या पहिल्या दोन्ही मॅचेस भारतीय टीमने जिंकल्या आहेत. त्यामुळे भारतीय टीमने मालिका खिशात घातली आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि दीपक चहर या तरुण खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली आहे. आज, शुक्रवारी, 23 जुलै रोजी या मालिकेतला (Ind vs SL) तिसरा आणि शेवटचा सामना कोलंबोतल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.