नवी दिल्ली 16 ऑक्टोबर : भारतात टॅलेंटची (Talent) अजिबातही कमी नाही. काम पूर्ण करण्यासाठी अशिक्षित लोकही असे काही जुगाड शोधून काढतात, जे पाहून उच्चशिक्षित लोकही डोक्याला हात लावतील. सध्या प्रवास करणाऱ्या सहा जणांच्या देशी जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Desi Jugad Viral Video) झाला आहे. यात सहा लोक एकाच गाडीवर बसल्याचं पाहायला मिळतं.
विमानतळावरील सुरक्षा रक्षकाकडे चिमुकलीनं यासाठी मागितली परवानगी, Emotional Video
हे वाचून तुम्ही कल्पना केली असेल की हे लोक एकमेकांना एकदम चिकटून बसलेले किंवा बाईकला लटकलेले असतील. मात्र, प्रत्यक्षात हे प्रकरण वेगळंच आहे. कारण हे लोक केवळ बाईकवर बसलेच नाहीत, तर त्यांच्याकडे इतकी जागाही शिल्लक आहे, की यावर इतरही लोक बसू शकतील. मात्र, हा प्रवास त्यांच्यासाठी कितपत सुरक्षित आहे, हे तुम्ही व्हिडिओमध्येच बघा.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की सहा जण बाईकवर आपलं सामान ठेवून आरामात प्रवास करत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल, की बाईकच्या छोट्या सीटवर हे कसं शक्य आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून तुम्ही त्यांच्या जुगाड आणि हिमतीला दाद द्याल. या लोकांनी एक शिडी आडवी केली आहे. तर मागे दोन चाकांच्या सहाय्याने ती गाडीला जोडली आहे. शिडीच्या खाली पाईपही ठेवले गेले आहेत. या शिडीचा लोक सीटप्रमाणे वापर करत असून आरामात त्यावर बसले आहेत.
VIDEO: दबंग नवरीबाईनं स्टेजवरच नवरदेवाला केलं गारद; वरानं हात जोडून मागितली माफी
पाहायला गेलं तर हा जुगाड त्यांच्यासाठी अतिशय घातकही होता. रस्त्यावर अशा पद्धतीनं बाईक वापरल्यानं अनेक दुर्घटनाही घडू शकतात. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram Video) @Giedde नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.