नवी दिल्ली 16 ऑक्टोबर : लग्न जमल्यानंतर हळूहळू नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) एकमेकांसोबत बोलू लागतात. अनेकदा तर दोघांच्या गाठीभेटीही सुरू होतात आणि नंतर दोघंही एकमेकांना ओळखू लागतात. यानंतर मजा मस्करीही सुरू होते. लग्नाआधीच नवरदेव आणि नवरी आपल्या डान्स परफॉर्मन्सची (Bride Groom Dance Performance) तयारी सुरू करतात. लग्नाच्या वेळी जेव्हा नवरी आणि नवरदेव स्टेजवर पाहुण्यांसमोर डान्स करतात तेव्हा हा डान्स सर्वांचीच मनं जिकंतो.
विमानातच बॉलिवूड गाण्यावर थिरकले प्रवासी; हा भन्नाट Video जिंकेल तुमचं मन
असाच काहीसा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात दिसतं की नवरीनं लग्नाच्या वेळी नवरदेवाला अचानक पकडलं आणि त्याच्या पोटात मारलं.
View this post on Instagram
नवरदेवही मार खाल्ल्याची अॅक्टिंग करू लागतो. अॅक्टिंग करताना नवरदेवाकडे पाहून असं वाटत नाही, की नवरीनं त्याला हळूच मारलं आहे. यानंतर नवरदेव सर्वांसमोर हात जोडून नवरीची माफी मागतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही नक्कीच हसू येईल.
VIDEO - नवरीला पाहताच नवरदेवाच्या मित्रांचा तोल ढासळला; धावत येत सर्वांसमोरच...
यानंतर माधुरी दीक्षित आणि सलमान खानचं प्रसिद्ध 'दीदी तेरा देवर दीवाना..' गाण्यावर नवरीनं अतिशय सुंदर डान्स परफॉर्मन्स केला. हा डान्स पाहून पाहुणेही खूश झाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर माय वेडिंग वेन्यू नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. या व्हिडिओला भरपूर लाईक्स मिळत आहेत. तर काही यूजर्सनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Wedding video