मराठी बातम्या /बातम्या /Viral /विमानतळावरील सुरक्षा रक्षकाकडे चिमुकलीनं या गोष्टीसाठी मागितली परवानगी, भावुक करणारा VIDEO

विमानतळावरील सुरक्षा रक्षकाकडे चिमुकलीनं या गोष्टीसाठी मागितली परवानगी, भावुक करणारा VIDEO

सुरक्षा टीमजवळ उभा असलेल्या एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल (Emotional Video of Little Girl) होत आहे. क्लिपमध्ये पाहायला मिळतं, की एक लहान मुलगी सुरक्षा रक्षकांजवळ जाते.

सुरक्षा टीमजवळ उभा असलेल्या एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल (Emotional Video of Little Girl) होत आहे. क्लिपमध्ये पाहायला मिळतं, की एक लहान मुलगी सुरक्षा रक्षकांजवळ जाते.

सुरक्षा टीमजवळ उभा असलेल्या एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल (Emotional Video of Little Girl) होत आहे. क्लिपमध्ये पाहायला मिळतं, की एक लहान मुलगी सुरक्षा रक्षकांजवळ जाते.

नवी दिल्ली 16 ऑक्टोबर : कधीकधी सोशल मीडियावर (Social Media) इतके खास व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहताच मनाला शांती मिळते. प्रेम (Love) हे एक असं नातं आहे, जे अतिशय निर्मळ आणि सुंदर असतं. हे प्रेम अगदी कोणाचंही असू शकतं. मग मोठी माणसं असू किंवा लहान मुलं. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात एका लहान मुलीचं आपल्या चुलतीवरील प्रेम पाहायला मिळतं. हा व्हिडिओ इतका प्रेमळ आहे, की अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विमानातच बॉलिवूड गाण्यावर थिरकले प्रवासी; हा भन्नाट Video जिंकेल तुमचं मन

कतरमध्ये हमद आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hamad International Airport in Qatar) सुरक्षा टीमजवळ उभा असलेल्या एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल (Emotional Video of Little Girl) होत आहे. क्लिपमध्ये पाहायला मिळतं, की एक लहान मुलगी सुरक्षा रक्षकांजवळ जाते. ती परवानगी मागण्यासाठी त्यांच्याकडे गेलेली असते. यात विशेष काय असं तुम्हाला वाटेल. मात्र, या व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हालाही ते कळेल.

कप्तान हिंदुस्तान नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यात दिसतं, की एक लहान मुलगी विमानतळावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जाते. ती त्यांच्याकडे परवानगी मागते आणि मग फ्लाईटच्या आगमनाआधी आपल्या चुलतीची गळाभेट घेण्यासाठी पुढे पळते. व्हिडिओ शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, तिनं आपल्या आंटीला निरोप देण्यासाठी परवानगी मागितली.

OMG! झटपट हेअर कटिंगचा असा जुगाड, काही सेकंदातच निम्मे केस गायब; पाहा VIDEO

हा व्हिडिओ सगळ्यांच्याच पसंतीस उतरत आहे. ट्विटरशिवाय इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 534.4K हून अधिकांनी पाहिला आहे. सोबतच यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Video Viral On Social Media